महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

भारतातील 75 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये एकीकडे विकासाला गती मिळत आहे तर दुसरीकडे चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, उष्णता आणि थंडी यांसारख्या हवामान बदलाचं केंद्र बनत चालले आहेत.

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा
मुंबईत पाऊस
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 1:12 PM

नवी दिल्ली : ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेने (Council on Energy, Environment and Water) दिलेल्या माहितीनुसार, भारतातील 75 टक्के जिल्ह्यांमध्ये हवामानाचं रौद्र रूप पाहायला मिळालं आहे. भारतातील 75 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये एकीकडे विकासाला गती मिळत आहे तर दुसरीकडे चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, उष्णता आणि थंडी यांसारख्या हवामान बदलाचं केंद्र बनत चालले आहेत. कारण ऐन थंडीत देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार केला. यामुळे राज्यावर पुन्हा वादळ येणार का? असा प्रश्न पडला आहे. (weather update ceew study says 75 pc districts indias population is facing extreme climate events)

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हल्लीच्या काही दशकांमध्ये वारंवार (Frequency) अशा नैसर्गिक संकटांची तीव्रता (intensity) आणि अप्रत्याशितता (unpredictability) सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतं. भारतात 1970 आणि 2005 या काळात भारतामध्ये हवामानविषयक 250 घटना घडल्या होत्या. तर बदलत्या हवामानामुळे 2005 मध्येच 310 घटना घडल्या.

संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, 40 टक्क्यांहून अधिक पूरग्रस्त भागात दुष्काळाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आलं तर याच्या उलट पूर कमी असलेल्या भागात पाण्याच्या पद्धत बदलल्याचं पाहायला मिळालं. हवामान महत्वाकांक्षा शिखर परिषदेच्या (Climate Ambition Summit ) दोन दिवस आधी याविषयी संशोधन सुरू करण्यात आलं होतं.

हवामानातील आपत्तीजनक घटनांमध्ये वाढ

सीईडब्ल्यू (CEEW) इथं झालेल्या संशोधन आणि कार्यक्रमाचं नेतृत्व करणाऱ्या अविनाश मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्याच्या काळात हवामानातील विनाशकारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या 100 वर्षात फक्त 0.6 डिग्री सेल्सियस तापमान वाढलं. गंभीर म्हणजे हवामानातील विनाशकारी बदलांमध्ये भारत जागतिक स्तरावर पाचव्या क्रमांकावर आहे. तर लवकरच सर्वात पूरग्रस्त देश होण्याच्या उंबरठ्यावर आहे.’

भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी हवामानातले सततचे बदल अत्यंत हानिकारक ठरत आहेत. सीईईयू अभ्यासानुसार असं आढळलं की, पूरांच्या घटनांची वारंवारता गेल्या 50 वर्षात जवळपास आठ पट वाढली आहे. इतकंच नाही तर पूर, दरडी कोसळणं, मुसळधार पाऊस, गारपीट, गडगडाट, ढगफुटी यासंदर्भातील घटनांमध्ये 20 पट वाढ झाली आहे.

19 दशलक्षाहून अधिक लोक पूरात सापडले

2005 पर्यंत पूरग्रस्त जिल्ह्यांची वार्षिक सरासरी 19 इतकी होती. पण 2005 नंतर ती 55वर पोहोचली. 2019 मध्ये भारतात 16 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला होता. तर आता भारतात 97 दशलक्षाहूनही जास्त लोक पुरात बुडाले आहे. बारपेटा, दारंग, धेमाजी, गोलपारा, गोलाघाट, शिवसागर हे जिल्हे गेल्या काही दशकात भारतातील सर्वात जास्त बाधित आठ जिल्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातही चक्रीवादळ आणि पुराचे रौद्र रुप पाहायला मिळते. निसर्ग चक्रीवादळासारख्या आसमानी संकटामुळे राज्याला मोठा फटका बसला. तर मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचाही फटका बसला आहे. (weather update ceew study says 75 pc districts indias population is facing extreme climate events)

इतर बातम्या – 

Weather Alert : राज्यासाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई-पुण्यातून रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या, 12 आणि 13 डिसेंबरला या गाड्यांच्या फेऱ्या रद्द

(weather update ceew study says 75 pc districts indias population is facing extreme climate events)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.