Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी

पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Weather Update : पालघरला रेड ॲलर्ट, मुंबईसह कोकण ते उत्तर महाराष्ट्रात मुसळधार, IMD कडून नवा अंदाज जारी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 5:41 PM

मुंबई: हवामान विभाच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत दमदार पावसानं हजेरी लावली. भारतीय हवामान विभागानं आता नवीन अंदाज जारी केला आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पालघर आणि नाशिकमध्ये तीव्र मुसळधारचा पण इशारा आज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. उद्या पावसाचा जोर जरी कमी असला तरी काही इशारे या भागात आहेत.

पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागांनं पालघर जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे ,औरंगाबाद, अहमदगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

नागपूर जिल्ह्यात वीज पडून गुराखी व 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हिंगणा तालुक्यातील रायपूर शिवारात घटना घडली. दलसिंह भाऊ राठोड़ असे मृत व्यक्तीचं नाव आहे. ते नेहमीप्रमाणे रायपूर शिवारात नाग नदीच्या काठावर बकऱ्या चरायला घेऊन गेले होते. पाऊस व विजेचा कडकडाट सुरूच होता,त्या परिसरात वीज पडली ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दलसिंह राठोड़ रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता मृतदेह आढळून आला आहे.

गडचिरोलीत मुसळधार पाऊस

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात सोमवार सांयकांळ पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. गडचिरोली चामोर्शी आष्टी महामार्ग चामोशी हून गोविंदगाव गावापासून बंद झालेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. त्या रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी वाहत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांची परवानगी बंद करण्यात आली. या महामार्गावर वाहतूक सध्या बंद आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाकडून जिल्ह्यांची यादी जारी

Weather Update today : राज्यात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पाऊस सुरु

Weather Update today IMD predicts heavy rainfall at Kokan and North Maharashtra issue red alert to Palghar

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.