ज्या गोष्टीची किळस वाटते, ती सोन्यापेक्षा महाग, तिची होणारी कोट्यवधींची तस्करी पकडली

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने धडक कारवाई करत कोट्यवधींची होणारी उलटीची तस्करी पकडली आहे. ही उलटी का असते इतकी महाग, तस्कर का देतात तिला कोट्यवधींची किंमत, आंतरराष्ट्रीय बाजारात का असते तिला मागणी... या बद्दल सर्वांना उत्सुक्ता असते.

ज्या गोष्टीची किळस वाटते, ती सोन्यापेक्षा महाग, तिची होणारी कोट्यवधींची तस्करी पकडली
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 12:56 PM

महेश सावंत, सिंधुदुर्ग : उलटी किंवा विष्ठा म्हटले की आपणास किळस येते. परंतु ही उलटी कोट्यवधीमध्ये विकली जाते. तिची मोठी तस्करी केली जाते. तिला समुद्रातील तरंगते सोने म्हटले जाते. तिच्या विक्री व खरेदीला बंदी आहे, या गोष्टींची माहिती तुम्हाला आहे का? सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने धडक कारवाई करत कोट्यवधींची होणारी तस्करी पकडली आहे. या प्रकरणात नऊ संशयितांना पकडले गेले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे.

मालवण मसुरे वेरळ येथील माळरानावर तब्बल 25 कोटी रूपयांची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ही धडक कारवाई केली. या प्रकरणात नऊ संशयितांना पकडले आहे. त्यांच्याकडून २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे. दोन चारचाकी गाड्या व एक दुचाकी असा सुमारे २५ कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई आहे.

पोलिसांनी लावला सापळा

हे सुद्धा वाचा

व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी काही जण येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने ही धडक कारवाई केली. त्यांनी सापळा रचून नऊ जणांना पकडले.

का वापरता व्हेल माशांची उलटी

व्हेल माशांच्या उलटीचा वापर नैसर्गिक परफ्युम्स बनवण्यासाठी केला जातो. महागडे सुगंधी उत्पादने बनविण्यासाठी तिचा वापर होतो. अनेक मोठे नामांकित परफ्युम ब्रॅन्ड्स या अँबरग्रीस म्हणजे उलटीचा होतो. बाजारात याला उलटीला कोट्यवधीची किंमत आहे.

का आहे कोट्यवधींची किंमत

व्हेल मासा समुद्रातील अनेक गोष्टी खातो. परंतु त्याला या गोष्टी न पचवता आल्याने उलटी करतो. ही उलट राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ आहे. एक प्रकारे ते मेणापासून बनवलेल्या दगडासारखा घन पदार्थ आहे. याला समुद्रातील तरंगते सोने म्हटले जाते. स्पर्म हा पदार्थ व्हेलच्या पोटात असतो. तो उलटीतून बाहेर पडतो. स्पर्मचा वापर औषधात, सिगारेट, मद्य तसेच खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठीही वापर केला जातो. उलटीचे वजन १५ ग्रॅमपासून १०० किलोपर्यंत असू शकतं. व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडणाऱ्या उलटीला दुर्गंधी येते. मात्र या उलटीचा वापर परफ्युम तयार करताना होतो. परफ्युमची निर्मिती करणाऱ्या कंपन्या उलटीचा वापर करतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.