Rajesh tope : कोविडनं मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 50 हजाराची मदत नेमकी कधी मिळणार? अटी काय? टोपे म्हणतात
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्याबाबत शासनानं काम सुरू केलं असून कोविन अॅपच्या माध्यमातून काम सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्याबाबत शासनानं काम सुरू केलं असून कोविन अॅपच्या माध्यमातून काम सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लवकर काम पूर्ण करून नीधी नेतेवाईकांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत
कोरोनाकाळात लाखो लोक कोरोनामुळे मृत्यू पावलेत. काही अल्पवयीन मुलांनी आई आणि वडील दोन्ही गमावल्यानं अनेकजण अनाथ झालेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. काही वयस्कर व्यक्तींनी कुटुंबातील कमावती माणसं गमावली आहेत. त्यांनाही आर्थिक मदतीची गरज आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यांना काहीतरी आर्थिक मदत व्हाही हे लक्षात घेऊन शासनानं आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे.
पैसे मिळण्याच्या अटी काय असणार?
हे पैसे खात्यात जमा होण्यासाठी काही अटी घातल्या गेल्या आहेत. कोरोनाचे निदान झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत मृत्यू झाला असेल असल्यास मदत मिळणार. मृत्यूच्या दाखल्यात कोरोनामुळे मृत्यू अशी नोंद नसली पण तरीही अटींची पूर्तता होत असली तरी 50 हजारांची मदत देण्यात येईल.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची दस्तक
कोरोनानं आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला असून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाचा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं दस्तक दिलीय. त्याबाबत राजेश टोपे यांनी काही महत्वाची माहिती दिलीय. बाहेरून येणारी विमान बंद करण्याची विनंती राज्यानं केंद्राकडे केल्याचं टोपेंनी सांगितलंय. त्यामुळे केंद्र सरकार आता याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे? हे पाहून आणखीही काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.