गावकऱ्यांनी गाव विकायला काढलं होतं, प्रशासकीय अधिकारी थेट गावात पोहचले, नंतर काय घडलं ?

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील गावकऱ्यांनी अजब निर्णय घेत सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता प्रशासनाने दखल घेतली असून गावकऱ्यांनी गावकऱ्यांची भेट घेतली आहे.

गावकऱ्यांनी गाव विकायला काढलं होतं, प्रशासकीय अधिकारी थेट गावात पोहचले, नंतर काय घडलं ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 4:55 PM

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी ( Fule Malwadi ) या गावातील गावकऱ्यांनी गावच विकायला काढलं होतं. त्यावरून थेट गावात प्रशासकीय अधिकाऱ्यानी धाव घेत गाव विकण्यामागील कारण जाणून घेतलं आहे. त्यामध्ये गावकऱ्यांनी केलेला प्रस्तावाच नायब तहसीलदार ( Tahsildar Deola ) यांच्या हातात ठेवत गावकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले आहे. संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. शेतकऱ्यांची थट्टा केली जात असून ही थट्टा थांबवा, आमचा निरोप सरकार पर्यन्त पोहचवा अशी मागणी करत गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथील गावकऱ्यांनी शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आक्रमक झाले होते. त्यावरून गावकऱ्यांनी एकत्र येऊन थेट गाव विकण्याचा प्रस्ताव तयार करत सरकारचे लक्ष वेधून घेतले होते.

संपूर्ण राज्यात फुले माळवाडी येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या अजब निर्णयाची चर्चा झाली असून गावकऱ्यांनी यावेळेला त्यांच्या व्यथा मांडल्या आहे. गेल्या काही वर्षांपासून कांदा पीकासह भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.

हे सुद्धा वाचा

फुलेमाळवाडी हे गाव जवळपास 95 टक्के शेती व्यवसाय करणारे आहे. त्यामुळे शेतकरी असलेल्या गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून निदर्शने व्यक्त करून सरकार लक्ष देत नसल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे.

संपूर्ण गाव विकून त्यातून येणाऱ्या पैशावर जीवन जगू असे म्हणत गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या धोरणापुढे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता. यावेळी एकमताने गावकऱ्यांनी प्रस्ताव करण्यास संमती दर्शवली होती.

त्यानंतर संपूर्ण राज्यात या फुलेमाळीवाडी गाव विकण्याची चर्चा असल्याने प्रशासकीय अधिकारींनी गावाकडे धाव घेलती. यावेळी नायब तहसीलदार यांच्यासह काही महसूल विभागातील कर्मचारी गावात पोहचले होते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यावेळेला संपूर्ण गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर तुमच्या भावना शासणाकडे पोहचू असे सांगत निवेदन स्वीकारले होते. त्यामुळे शासकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

एकूणच प्रशासकीय पातळीवर गावकऱ्यांच्या भूमिकेची दखल घेण्यात आली असली तरी दुसरीकडे मूळ मागणीवर अंमलबजावणी होते का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. शेतीमाला योग्य भाव द्या ही प्रमुख मागणी गावकऱ्यांची आहे.

नुकतेच नाशिक जिल्ह्यातील शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा आणि द्राक्ष बागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. त्यात अद्यापही पंचनामे सुरू न झाल्याने शेतकरी नाराज आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.