AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉडेल ते तरूण मुख्यमंत्री, संघांचे विश्वासू अन् प्रशासनावर पकड; देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास

Who is Devendra Fadnavis Maharashtra New Cm : महायुती सरकारचा शपथविधी आज पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथविधी घेणार असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? वाचा सविस्तर...

मॉडेल ते तरूण मुख्यमंत्री, संघांचे विश्वासू अन् प्रशासनावर पकड; देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास
देवेंद्र फडणवीस, नेते, भाजपImage Credit source: ANI
| Updated on: Nov 26, 2024 | 12:43 PM
Share

महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं आहे. भाजप 132 जागा जिंकत मोठा पक्ष ठरला आहे. लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतीची माहिती अद्यापर्यंत गुलदस्त्यात आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. काही वेळा आधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राजभवनावर गेले होते. तेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीकडे सर्वांच्या नजरा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची धुरा गेली तर ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळतील.

नगरसेवक ते मुख्यमंत्री

नागपूर महापालिकेतून देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय जीवनात पाय रोवले. अवघ्या 22 व्या वर्षी ते नगरसेवक झाले होते. मग सर्वात तरूण महापौर असल्याची नोंद फडणवीसांच्या नावावर आहे. नंतर ते नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार झाले. भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळलं आहे. 2014 ला अवघ्या 44 व्या वर्षी ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कमी वयात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे शरद पवारांनंतर ते दुसरे नेते ठरले. 2019 ला महाविकास सरकारच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ला मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. तसंच 2022 पासून त्यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यांची प्रशासनावर पकड आहे. भाजपच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची भूमिका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासू नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा नंबर वरचा आहे. शिवाय प्रशासनाचा अनुभव असल्याने मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस वरचढ ठरतात.

देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मॉडेलिंग

देवेंद्र फडणवीस यांची पर्सनॅलिटी पाहून त्यांचे बालपणीचे मुख्यमंत्री विवेक रानडे यांनी मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. देवेंद्र फडणवीसही त्यासाठी तयार झाले. 2006 ला त्यांनी नागपुरातील एका कपड्याच्या दुकानासाठी फोटोशूट केलं होतं.

Devendra Fadnavis modelling Photos

देवेंद्र फडणवीस यांचा जुना फोटो…

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.