गुणरत्न सदावर्ते म्हणजे कोण?, अमोल मिटकरी यांनी घेतला खरपूस समाचार
अमृता फडणवीस ज्या स्टेजवर होत्या त्या स्टेजवर बाबा रामदेव यांनी आज महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं.
अकोला : गेले काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचा निषेध सर्व राज्यातून होत आहे. तर फक्त देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि शिंदे सरकारमधील काही मंत्री वगळता बाकी सर्वांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. पण हा मुद्दा तापतो आहे. म्हणून अमित शहा यांनी राज्यपालांना दिल्लीला बोलावून घेतलं आहे. कारण राज्यपालांनी माफी मागितली तर आपल्यावर नामुस्की होईल. ही काळाची पाहुले भाजपने ओळखली आणि भाजपनं पहिलं पिल्लू सोडलं, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं की, सोलापूर जिल्ह्यातील 40 गाव ही कर्नाटकमध्ये येतील. किंवा पंढरपूरसुद्धा घेऊ. हे सोडलेले एक पिल्लू आहे. आणि हे एक षड्यंत्र आहे. मूळ मुद्द्याला बाजूला ठेवत चर्चा भरकटवणे असा हा प्रकार आहे.
अमृता फडणवीस ज्या स्टेजवर होत्या त्या स्टेजवर बाबा रामदेव यांनी आज महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणं. यामुळं रामदेव बाबांना एवढं तरी कळायला हवं की ही संतांची भूमी आहे. संतांनी पूर्वीच लिहून ठेवलं आहे की अशा भोंदू बाबांच थोबाड फोळा. म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी रामदेव बाबांचा चांगला समाचार घेतला आहे.
तर सदावर्ते हे असे असतात की जसं महेश कोठारे यांचा झपाटलेला पिक्चरमधील कवट्या महाका… सदावर्ते हे महाराष्ट्राचे तुकडे करण्याचं काम करत असल्याचं मिटकरी म्हणतात. तर हे कवट्या महाकाळ सोडलेले भाजपचं एक पात्र आहे. त्यामुळे बसवराज बोम्मई, रामदेवबाबा असेल किंवा गुणरत्न सदावर्ते यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याकरिता भारतीय जनता पार्टीकडून केलेले प्रकार आहेत.
राज्यपालांना राजीनामा द्यावा लागला. राज्यपालांची हकालपट्टी झाली. किंवा राज्यपालांच्या वक्त्यावरून महाराष्ट्र बंदला हाक दिली तर… भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकारची नाचक्की होईल.
त्यामुळे तापलेलं हे प्रकरण शांत करण्याकरिता हे सगळे मुद्दे समोर आले आहेत. बाबा रामदेव, गुणरत्न सदावर्ते, बसवराज बोम्मई हे भारतीय जनता पार्टीची लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचा आरोपी यावेळी मिटकरी यांनी केला आहे.