काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावणारा शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री, कोण आहेत संजय राठोड?

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे.

काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावणारा शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री, कोण आहेत संजय राठोड?
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 3:45 PM

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा (Who is Shivsena leader Sanjay Rathod accused in Pooja Chavan suicide case).

संजय राठोड बंजारा समाजातून येतात. शिवसैनिक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या संजय राठोड यांनी काँग्रेसच्या गडामध्येच कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांना यवतमाळचं शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाही मिळालं. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी झंझावाती पक्ष बांधणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना रुजवली. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव ठाकरे यांचा दारुण पराभव केला आणि काँग्रेसच्या गडावर भगवा झेंडा फडकावला.

2009 मध्ये देखील संजय राठोड यांनी काँग्रेसचे तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. यावेळी त्यांच्या विजयातील मताधिक्य नजरेत भरणारं होतं. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या मोजक्या 5 आमदारांमध्ये संजय राठोड यांचा समावेश होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 8 8,6464 च्या विक्रमी फरकाने ते जिंकले, जे महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे आहे.

2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वसंत घुईखेडकर यांचा पराभव करून राठोड यांनी हॅटट्रिक साधली. गेल्या 2019 मध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख आव्हान उभे करतील, अशी चर्चा होती. मात्र, या निवडणुकीतही राठोड यांनी तब्बल 60 हजारांवर मते घेऊन सलग चौथ्यांदा विधानसभेत प्रवेश केला. सतत मतदारांच्या संपर्कात असणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.

ते 2004 ते 2019 या काळात सलगपणे विधानसभेवर निवडून जात आहेत. त्या ताकदीवर त्यांनी शिवसेनेचा आमदार ते थेट कॅबिनेटमंत्री असा प्रवास केलाय. सध्या ते राज्याचे वनमंत्री आहेत.

कोणत आहेत संजय राठोड?

  • संजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत
  • शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले.
  • त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले.
  • फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.
  • 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.
  • संजय दुलीचंद राठोड हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत.
  • ते दिग्रस विधानसभा मतदार संघातून 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.
  • 2009 मध्ये पुन्हा निवडून आले.
  • 2014 मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यांना महसूल विभाग देण्यात आला.
  • यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारीदेखील देण्यात आली.
  • 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते.

हेही वाचा :

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप आक्रमक; संजय राठोड नॉट रिचेबल

बँक खातं भरलेलं असावं, नाती समृद्ध असावी म्हणाणाऱ्या पूजाने टोकाचं पाऊल का उचललं? बोलक्या इन्स्टाग्राम पोस्टनी चटका लावला!

चित्रा वाघ कडाडल्या, “वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”

व्हिडीओ पाहा :

Who is Shivsena leader Sanjay Rathod accused in Pooja Chavan suicide case

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.