महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं वक्तव्य

राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचबाबत सुप्रिया सुळे यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? सुप्रिया सुळे यांचं सर्वात मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 8:33 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत प्रचंड घडामोडी घडत आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तिथे जावून त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी काही आप पक्षच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती. याशिवाय राज्यातही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विधानसभेच्या जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा होत आहे. तर दुसरीकडे मविआत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत वेगवेगळे दावे नेत्यांकडून केला जातोय. याच प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं तर मुख्यमंत्री कोण होईल किंवा आगामी निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचं सरकारन बनणं कठीण आहे. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनेल, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचा कुणी नेता मुख्यमंत्री बनेल. आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर आहे. आम्हाला कोणत्या पदाची इच्छा नाही”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

‘भाजप आता पहिल्यासारखा पक्ष राहिला नाही’

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन शरद पवार गटाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जातोय. सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला. “भाजप आता पहिल्यासारखा पक्ष राहिला नाही. आधी भाजपचे नेते आणि आमच्या मतभेद असायचे. पण तरीही अशी अवस्था नसायची. भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना मी माझी गुरु मानते. आताच्या भाजपाच अशा नेत्यांची खरंच कमी आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

“माझी आणि माझ्या पक्षाची आधीपासूनच ही भूमिका राहिली आहे की, जातीय जनगणना व्हायला हवी. आरएसएसची हीच भूमिका राहिली तर मी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करते”, अशीदेखील प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.