Ajit Pawar | अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले, त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंद का अनुपस्थित होते?

Ajit Pawar | अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन बसले. त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे का अनुपस्थित आहेत, त्याची चर्चा रंगली होती. त्यावर भरत गोगावले यांनी उत्तर दिलं.

Ajit Pawar | अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले, त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंद का अनुपस्थित होते?
Eknath Shinde-Ajit Pawar
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 11:59 AM

मुंबई : आज मुंबईत मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या मंचावर एक घटना घडली, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मनोर आमदार निवासाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गो-हे आणि इतर आमदार उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार अनावधानाने मुख्यमंत्र्यांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसले.

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या नावाची आधीच मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे. त्यात अजित पवार आज थेट मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर जाऊन बसले.

एकनाथ शिंदे हजर नव्हते

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वत: अजित पवार यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्यास सांगितलं. कारण एकनाथ शिंदे आजच्या कार्यक्रमाला हजर नव्हते. अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्याआधी राहुल नार्वेकर यांनी त्यावरील स्टिकर काढून टाकला.

शिंदे समर्थक आमदार गोगावले काय म्हणाले?

मुख्यमंत्री आजच्या मनोरा आमदार निवास भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. या बद्दल शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी माहिती दिली आहे. “अंगात ताप आणि कणकण असल्याने मुख्यमंत्री आले नाहीत. आम्ही थांबलो होतो. चौकशी केली, तेव्हा त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रम उरकुन घेण्यास सांगितलं” असं भरत गोगावले म्हणाले.

काही गडबड नाहीय ना?

“उपमुख्यमंत्री अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले, त्यावर हे सर्व अनावधानाने घडलं, यात काही गडबड नाहीय” असं भरत गोगावले म्हणाले. आमदारांसाठी भव्य वास्तू उभी राहतेय, याचा आनंद आणि समाधान आहे असं ते म्हणाले.

प्रत्येक फ्लॅट 1000 चौरस मीटरचा

मनोरा आमदार निवासात 40 आणि 28 मजल्याच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. दोन्ही इमारतीत प्रत्येक फ्लॅट 1000 चौरस मीटरचा असेल. या दोन्ही इमारतींच्या बांधकामावर 1300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांच्या निवासासाठी या इमारती बांधण्यात येणार आहेत. बुहतेकदा आमदार निवासात राज्यभरातून येणारे कार्यकर्ते मुक्कामाला असतात.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.