पूजा चव्हाणप्रकरणी गृहमंत्री, पोलीस का बोलत नाहीत?; चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
जा चव्हाण आत्महत्या प्रकरणारवरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही सवाल केले आहेत. (why police is not talking about Pooja Chavan Suicide Case?, asked chandrashekhar bawankule)
यवतमाळ: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणारवरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही सवाल केले आहेत. पूजाप्रकरणी ज्या मंत्र्याचं नाव समोर येत आहे, ते मंत्री समोर येऊन का बोलत नाहीत?, पोलीस आणि गृहमंत्री या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. (why police is not talking about Pooja Chavan Suicide Case?, asked chandrashekhar bawankule)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. एका कॅबिनेट मंत्र्यावर या प्रकरणात आरोप झाले आहेत. ते पुढे येऊन का बोलत नाहीत? हे कॅबिनेट मंत्री पोलिसांच्या सुरक्षेत आहे का? काही चूक केली नसेल तर मंत्र्याने समोर येऊन बोललं पाहिजे. जे सुरू आहे ते योग्य नाही. या प्रकरणाची लवकर चौकशी झाली पाहिजे, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
या प्रकरणाच्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात हा मंत्री चक्क पुरावे नष्ट करायला सांगत आहे. या पेक्षा आणखी काय पुरावे हवे आहेत. हे सरकार मंत्र्याच्या पाठिशी उभे असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तर आंदोलन करू
पूजा भोवळ येऊन पडल्याचं पोलीस सांगत आहेत. मग पोलीस त्यावर प्रेस रिलीज का काढत नाही? या प्रकरणाची योग्य माहिती जनतेसमोर आलीच पाहिजे. माहिती समोर आली नाही तर वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. पूजा 2 फेब्रुवारी रोजी यवतमाळला आली होती. त्यावेळी तिने रुग्णालयात वेगळंच नाव सांगितल्याचंही ऐकण्यात आलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
काय घडलं त्या रात्री?
पूजा चव्हाणचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. मात्र 7 फेब्रुवारीला रात्री दीड वाजता तिनं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली होती. (why police is not talking about Pooja Chavan Suicide Case?, asked chandrashekhar bawankule)
VIDEO : पूजा चव्हाण प्रकरणात गृहमंत्री गप्प का? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल#poojachavan #PoojaChavanSuicide @cbawankule @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/MA6jZp14xM
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
संबंधित बातम्या:
Pooja Chavan Suicide Case Live Updates : संजय राठोड प्रकरणावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
(why police is not talking about Pooja Chavan Suicide Case?, asked chandrashekhar bawankule)