Sanjay Raut Video: भाजप नेत्यांविरोधात कारवाईच्या नुसत्या पोकळ धमक्या? शिवराळ राऊत ‘कायद्या’वर का आले? राष्ट्रवादी कनेक्शन? स्पेशल रिपोर्ट

ईडीपासून आयकर विभाग ते सीबीआयने आघाडीतील नेत्यांच्या घरावर धाडी मारल्याने आघाडीचे नेते हादरून गेले आहेत. वारंवार सुरू असलेल्या या कारवाईमुळे शिवसेना नेते संजय राऊत मध्यंतरीच्या काळात प्रचंड संतापले होते.

Sanjay Raut Video: भाजप नेत्यांविरोधात कारवाईच्या नुसत्या पोकळ धमक्या? शिवराळ राऊत 'कायद्या'वर का आले? राष्ट्रवादी कनेक्शन? स्पेशल रिपोर्ट
भाजप नेत्यांविरोधात कारवाईच्या नुसत्या पोकळ धमक्या? शिवराळ राऊत 'कायद्या'वर का आले?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 7:01 PM

मुंबई: ईडीपासून आयकर विभाग ते सीबीआयने आघाडीतील नेत्यांच्या घरावर धाडी मारल्याने आघाडीचे नेते हादरून गेले आहेत. वारंवार सुरू असलेल्या या कारवाईमुळे शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (Sanjay raut) मध्यंतरीच्या काळात प्रचंड संतापले होते. खासकरून भाजप नेते किरीट सोमय्यांवर (kirit somaiya) राऊत भलतेच भडकले होते. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी सोमय्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. राऊत यांनी अचानक शिवराळ भाषेचा वापर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राऊत शब्द तोलून मापून बोलताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर ते कायद्याची भाषा बोलत आहेत. कोणत्याही गोष्टीवर कायद्याने सर्व काही होईल असं ते सांगत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीच्या भाजपसोबतच्या कनेक्शनमुळे तर राऊत शिवराळ भाषेवरून कायद्याच्या भाषेवर आले नाहीत ना? असा सवाल केला जात आहे.

राऊत: 20 फेब्रुवारी 2022, सकाळची वेळ

संजय राऊत यांनी 20 फेब्रुवारी रोजी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांचा शिवराळ भाषेत उद्धार केला होता. हे कोण म्हणाले. कोण आहेत ते. मला माहीत नाही. असे Xत्या असतात या देशात. आणि प्रत्येक Xत्यांवर प्रश्न उत्तरं विचारणं मीडियाला शोभा देत नाही. देशाचं राजकारण 2024 नंतर बदलेल. त्यावेळी असे Xत्यांना संपुष्टात आणेल. असे लोक या देशात राहणार नाहीत. स्वच्छ, पारदर्शक आणि लोकशाहीवादी राजकारण असेल. 10 मार्च नंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. उद्धव ठाकरेंना एक मुख्यमंत्री भेटायला येतो, त्यांचा अशा प्रकारचा अपमान करणं हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. हा मराठी माणसाचा अपमान आहे म्हणून मी त्यांना XX बोललो आहे, अशी शिवराळ टीका राऊत यांनी केली होती.

राऊत: 1 एप्रिल 2022, सकाळची वेळ

लढायची गरज नाही. महाराष्ट्राच्या पोलिसांना काही सूचना मिळाल्या तर काम होऊ शकेल. राज्याच्या गृहखात्याने अधिक सक्षम होणं गरजेचं आहे, एवढंच मी सांगतो. काल मुख्यमंत्र्यांशी माझी या विषयावर चर्चा झाली. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसत आहेत. ते खरं म्हणजे महाराष्ट्राच्या गृहखात्यावर आक्रमण आहे, हे समजून घ्या. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था, पोलीस व्यवस्था ज्यांच्याकडे आहे त्यांनी याकडे फार गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असं राऊत आज सकाळी म्हणाले.

राऊत: 1 एप्रिल 2022, दुपारची वेळ

योग्यवेळी अशा गुन्हेगारांच्या कॉलरला हात घालायचा अशा राजकीय गुन्हेगारांच्या हात घातला जाईल, असं राऊत आज म्हणाले. भाजपच्या दबावामुळे केंद्रीय यंत्रणा जशा कारवाया करतात तशा आम्ही कारवाया करू असे अजिबात नाही. आमचं राज्य कायद्याचं आहे. ज्या गोष्टी आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत होतील. सूडाने आणि बदल्याच्या भावनानेने काहीच होणार नाही. योग्यवेळी कायदेशीर मार्गाने ज्यांच्या कॉलरला हात घालायचं तो घातला जाईल, असंही राऊत म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाला मी पुराव्यासह कळवलं आहे. हा विषय केंद्रीय तपास यंत्रणेशी संबंधित आहे. पंतप्रधान कार्यालय नेहमी भ्रष्टाचार मुक्त भारताची भाषा करते म्हणून सगळयात आधी त्यांच्याकडून काय कारवाई होते याकडे लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रातील यंत्रणांकडे मी जी कागदपत्रे दिली आहे, त्यासंदर्भात काय कारवाई झाली हे तुम्हाला लवकरच दिसेल, असंही ते म्हणाले. खासदार म्हणून मी काही कागदपत्रे देतो किंवा भूमिका मांडतो तेव्हा त्यांना माझ्या कागदपत्रांची दखल घ्यावी लागेल. या देशात आजही संसदेल, संसद सदस्याला त्याने दिलेल्या पुराव्याला महत्त्व आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कारवाई होणं म्हणजे पोलिसांनी उठून जावं आणि कारवाई करणं असं नाही. मी कुणाचंही नाव घेतलं नाही. पण पुरावे दिले आहेत. पोलिसांना तपास पूर्ण करू द्या. शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण कोणत्याही निरपराधावर चुकीची कारवाई होऊ नये हे आमच्या संविधानाचं ब्रीद वाक्य आहे ते आम्ही पाळतो, असंही ते म्हणाले.

कायद्याची भाषा का?

राऊत यांनी एकाएकी कायद्याची भाषा सुरू केली आहे. राऊत यांची भाजप नेत्यांवर शिवराळ भाषा सुरू असताना दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांचं कौतुक सुरू होतं. त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात होते. त्यानंतर राऊत यांनी अचानक भाषा बदलून कायद्याची भाषा सुरू केल्याने पडद्यामागे बरंच काही घडलं असावं, अशी चर्चा आहे.

संबंधित बातम्या:

Shivsena NCP: शिवसेनाला गृहखातं हवंय?, भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने सेना-राष्ट्रवादीत धूसफूस; गृहमंत्री घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Sanjay Raut On ED: आता रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास तेवढा ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी; राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra News Live Update : 6 एप्रिलला धोपेश्वर येथे ग्रामसभेचं आयोजन; रिफायनरीबाबत होणार ठराव

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.