AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात कामगारांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार; आरोग्यमंत्री लागले कामाला

मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या जालन्यातील हजारो कामगारांवर उपचार करण्यसाठी जालन्यात कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी)चे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. (Will build a new ESIC hospital in jalna, says rajesh tope)

जालन्यात कामगारांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार; आरोग्यमंत्री लागले कामाला
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 8:10 PM

जालना: मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या जालन्यातील हजारो कामगारांवर उपचार करण्यसाठी जालन्यात कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी)चे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दहापेक्षा अधिक कामगार काम करत असलेल्या सर्व आस्थापनांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. (Will build a new ESIC hospital in jalna, says rajesh tope)

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीला दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. तसेच जिल्ह्यात ईएसआयसीचे रुग्णालय उभारण्याचा मानसही व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, ईएसआयसीचे उपसंचालक चंद्रभान झा, संजीव यादव आदी उपस्थित होते.

18 हजार कामगारांची नोंदणी शिल्लक

केंद्र शासनाच्या अखत्यारित असेलेले कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी) हे कामगारांना विविध सेवा, सुविधा देण्याचे काम करते. ज्या जिल्ह्यामध्ये 30 हजारापेक्षा अधिक कामगारांनी ईएसआयसीमध्ये नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी या मजुरांसाठी सर्व सुविधांनीयुक्त असे रुग्णालय उभारण्यात येते. जालना जिल्ह्यात मोठी औद्योगिक वसाहत असण्याबरोबर जिल्ह्याच्या आठही तालुक्यात 10 पेक्षा अधिक कामगार काम करत असलेल्या अनेक आस्थापना आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार कामगारांची ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्यात आलेली असून केवळ 18 हजार कामगारांची नोंदणी करणे शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक काम करणाऱ्या सर्व आस्थापनांनी येत्या १० दिवसांमध्ये ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन टोपे यांनी केले.

कॅशलेस उपचार ते निवृत्तीवेतन

ईएसआयसीच्या रुग्णालयातुन कामगारांना कॅशलेस पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने उपचार दिले जातात. या रुग्णालयातून उपचार घेत असताना वैद्यकीय खर्चाची कुठलीही मर्यादा नसल्याने मोठमोठ्या आजारावरदेखील या ठिकाणी उपचार देण्यात येतात. ईएसआयसीमध्ये नोंदणी करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच अपघातामध्ये जर कामगाराचा मृत्यु झाला तर अशा कामगाराच्या कुटूंबीयांना निवृत्तीवेतन देण्याबरोबरच इतरही सुविधा ईएसआयसीमार्फत देण्यात येत असल्याचे सांगत कामगार बांधवांना आधार देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच आस्थापनांच्या मालकांनी सामाजिक बांधिलकी जपत या रुग्णालयाच्या उभारणीसाठी हिरिरीने यामध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले. ईएसआयसीमध्ये आस्थापनांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची सूचना करत यामध्ये जिल्ह्यात दररोज किती आस्थापनांनी नोंदणी केली याचा दैनंदिन आढावा घ्यावा. नोंदणी करण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर आस्थापनांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

तर, जिल्ह्यात कामगारांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय उभारण्याचा पालकमंत्र्यांचा मानस असून जिल्ह्याच्या व कामगारांच्यादृष्टीने अत्यंत चांगली बाब आहे. ईएसआयसीमध्ये नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील आस्थपनांनी प्रशासनास द्यावी. नोंदणीसाठी आस्थापनांना प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल, असे सांगत याबाबत लवकरच कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले.

लसीकरण करा

१ एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक आस्थापना मालक व त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रुग्णांची माहिती आता ॲपवर

जिल्ह्यातील रुग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत याची माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असता यावर बिनवडे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात कोव्हीड बाधितांवर उपचार करण्यासाठी किती खाटा शिल्लक आहेत याची माहिती रुग्णालयात उपलब्ध करुन देण्याबरोबरच एक नवीन ॲप विकसित करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांना उपलब्ध खाटांची माहिती ॲपद्वारे त्यांच्या मोबाईलवर लवकरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Will build a new ESIC hospital in jalna, says rajesh tope)

440 कोरोनाबाधितांची नोंद

दरम्यान, आज जालना जिल्ह्यात 440 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसेच 223 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण 30106 संशयित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 1562 व्यक्ती भरती आहेत. जिल्ह्यात एकूण 8878 रुग्णांवर उपाचर सुरू असून आतापर्यंत 15137 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Will build a new ESIC hospital in jalna, says rajesh tope)

संबंधित बातम्या:

जालन्यात लॉकडाऊनच्या चर्चांना जोर; जिल्हाधिकारी बिनवडे म्हणतात…

जालन्यात कोरोनाचा एकही बळी जाता कामा नये, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करा; आरोग्यमंत्री टोपेंच्या सूचना

शॉपिंग मॉल, सिनेमागृहात मास्क बंधनकारक; अंत्यविधीपासून लग्नापर्यंत जालन्यातील नवे निर्बंध काय?

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एका बेडवर 3 रुग्ण!

(Will build a new ESIC hospital in jalna, says rajesh tope)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.