AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का? काय असेल एकनाथ शिंदे, भाजपाची खेळी?

आता सरकार पूर्णपणे पडण्यापेक्षा या सरकारचे नेतृत्व आता एकनाथ शिंदेंनी करावा असा प्रस्ताव ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी समोरासमोर चर्चेसाठी यावं, असं आवाहन उद्धव यांनी केल्याचं मानण्यात येतं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि भाजपासोबत जावं, यासाठी बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंसमोर हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. आता एकनाथ शिंदेंकडे काय पर्याय आहेत त्यावर एक नजर

Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का? काय असेल एकनाथ शिंदे, भाजपाची खेळी?
Shinde CM optionsImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 7:59 PM

मुंबई – बंडखोरांनी समोरासमोर चर्चेसाठी यावे आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेऊन जावा, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केले असले तरी आता यामागे शरद पवार (Sharad Pawar)यांचा एक सल्ला असल्याचे मानण्यात येते आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडू द्यायचे नसेल तर, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना मुख्यमंत्री करा, असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचे सांगण्यात येते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचं सांगितलं जातंय. मात्र आता सरकार पूर्णपणे पडण्यापेक्षा या सरकारचे नेतृत्व आता एकनाथ शिंदेंनी करावा असा प्रस्ताव ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी समोरासमोर चर्चेसाठी यावं, असं आवाहन उद्धव यांनी केल्याचं मानण्यात येतं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि भाजपासोबत जावं, यासाठी बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंसमोर हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. आता एकनाथ शिंदेंकडे काय पर्याय आहेत त्यावर एक नजर

1. एकनाथ शिंदे पर्याय फेटाळतील

महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावे, असा प्रस्ताव जरी एकनाथ शिंदेंना देण्यात आला तरी सद्यस्थितीत हा पर्याय एकनाथ शिंदे फेटाळतील. हीच शक्यता सर्वाधिक आहे. कारण बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि विकास या मुद्द्यावर त्यांनी हे बंड केलेले आहे. त्यांनी जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचा मुख्यमंत्रीपदाचा पर्याय स्वीकारला. तर हा सगळा संघर्ष केवळ मुख्यमंत्रीपदासाठी होता, असा संदेश जाईल. यातून एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेवरच परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो हा पर्याय स्वीकारतील याची शक्यता कमी आहे.

2. भाजपाचा बंडामागील सहभाग आणि दबाव हेही प्रस्ताव नाकारण्याचे कारण

एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड जरी प्रथमदर्शनी शिवसेनेच्या आणि शिवसेना सहयोगी आमदारांचे वाटत असले तरी, यामागचे नियोजन हे भाजपाचे असल्याचे मानण्यात येते आहे. बंडाचे टायमिंग, त्यानंतर गुजरातमध्ये शिवसेना आमदारांची करण्यात आलेली व्यवस्था, तिथे त्यांना देण्यात आलेले गुजरात पोलिसांचे सरंक्षण, त्यानंतर गुवाहाटीत त्यांची करण्यात आलेली व्यवस्था, त्यासाठी झालेली विमानांची सोय. गुवाहाटीतही बंडखोर आमदारांना देण्यात आलेली सुरक्षा. या सगळ्यामागे खचितच भाजपा आहे, हे सांगण्याची वेगळी गरज नाही. त्यामुळे आता भाजपासोबत इतके पुढे गेल्यानंतर, आघाडी सरकारच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफऱ स्वीकारणे एकनाथ शिंदेंना अडचणीचेच ठरण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

3. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारतील

महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याची संधी एकनाथ शिंदे स्वीकारतील. असे घडणे अवघड असले तरी हा पर्याय म्हणून असूच शकतो. असे झाल्यास त्यांना भाजपा, शिवसैनिक, शिवसेना पक्षप्रमुख, वरिष्ठ नेतेमंडळी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या सगळ्यांनाच तोंड द्यावे लागणार आहे. एवढे करुन मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही आघाडी सरकारमध्ये त्यांना रोषाला सामोरे जावे लागेल ते वेगळेच, तसेच आत्ता त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोरांच्या भविष्याचा निर्णयही त्यांना करावा लागेल.

4. शिंदेंना मुख्यमंत्रीपद हुलकावणी देण्याची शक्यता

अशा स्थितीत मुख्यमंत्रीपद समोर असूनही, भाजपासोबत असल्याने एकनाथ शिंदे यांना ही खुर्ची हुलकावणी देण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुखांसोबत आता संबंध ताणले गेलेले आहेत, बंडखोर आमदारांची जबाबदारीही आता त्यांच्यावर आहे, त्यांचे पुनर्वसन भाजपासोबत गेल्यासच होऊ शकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आता शिंदेंसमोर भाजपासोबत जाण्याशिवाय तूर्तास तरी दुसरा पर्याय दिसत नाही. मुख्यमंत्रीपदाऐवजी आता उपमुख्यमंत्री पदावरच शिंदेंनाच समाधान मानावे लागणार आहे.

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.