Sanjay Raut : केंद्राला लाज वाटत असेल तर सोमय्याची सुरक्षा काढा; संजय राऊत आक्रमक

Sanjay Raut : केंद्राला लाज वाटत असेल आणि आपल्या सैनिकांविषयी आस्था आणि जाणीवा असेल तर त्यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्राला ठणकावले आहे.

Sanjay Raut : केंद्राला लाज वाटत असेल तर सोमय्याची सुरक्षा काढा; संजय राऊत आक्रमक
केंद्राला लाज वाटत असेल तर सोमय्याची सुरक्षा काढा; संजय राऊत आक्रमकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 7:32 PM

मुंबई: सेव्ह विक्रांत भ्रष्टाचार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. केंद्राला लाज वाटत असेल आणि आपल्या सैनिकांविषयी आस्था आणि जाणीवा असेल तर त्यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केंद्राला ठणकावले आहे. केंद्राच्या तपास यंत्रणांनी सोमय्याचा तपास करून त्यांना महाराष्ट्र पोलिसांच्या (maharashtra police) ताब्यात दिलं पाहिजे. शंभर टक्के ते या क्षणी भाजप शासित राज्यात लपले असतील. ते गोव्यात किंवा गुजरातमध्ये असतील. या दोन राज्यातच महाराष्ट्रातील गुन्हेगारांना आश्रय मिळतो. या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लक्ष घालावं. सोमय्यांना अटक करून पोलिसांच्या ताब्यात द्यावं. त्यांना माहीत आहे सोमय्या कुठे लपलाय. मलाही माहीत आहे. मी पोलिसांना सांगेल, असंही राऊत म्हणाले. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

भाजप नेते किरीट सोमय्या या महाशयाने सेव्ह विक्रांतच्या नावाने पैसे गोळा करण्यास सुरूवात केली. त्याकाळातील त्यांचे ट्विट आहेत. त्यांनी केवळ 711 डबे फिरवले नाही, त्याच्याकडे जमा झालेले डबे 711 ते काही म्हणतील. ते डबे गच्च भरले. या शिवाय सेव्ह विक्रांतच्या नावावर अनेकांकडून पैसे घेतले. याच्या पावत्या नसतात. आता ते पुढे येत नाही. 58 कोटी मी सांगतो. त्यांच्या ट्विटमधून 140 कोटीची माहिती आली आहे. हे पैसे तेव्हा राजभवनात जमा करू अशी त्यांची भूमिका होती. तेव्हा राजभवनाच्या नावावर अकाऊंट नाहीये हे त्यांना माहीत नव्हतं का?, असा राऊत यांनी केला.

सोमय्यांनी निवडणुकीत पैसा वापरला

राजभवनाच्या नावाने अनेकांनी चेक दिल्याचे मी फोटो पाहिलं. जर राजभवनाच्या नावाने अकाऊंट नव्हतं तर त्यांनी मुख्यमंत्री निधीत पैसे द्यायचे, केंद्रात द्यायचे. त्यांनी हे पैसे पक्षाकडे जमा केल्याचं त्याचे वकील सांगत आहेत. त्याने हे पैसे निवडणुकीत वापरले हा गुन्हा त्यांनी कबुल केला आहे. 20 ते 25 कोटी रुपये त्यांनी निवडणुकीत वापरले. निकॉन इम्फ्रा ही त्याच्या मुलाची कंपनी आहे. पीएमसी बँकेत हा पैसा पांढरा करून मुलाच्या कंपनीत वळवला. आर्थिक गुन्हे शाखा जेव्हा त्यांना ताब्यात घेईल तेव्हाच याची माहिती मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut : सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊत

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या

Kolhapur North Assembly : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस? पोलिसांना किती पाकीटं सापडली?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.