वहिनी आणि पुतणीची हत्या, वासनांध दिराचा मृतदेहांवर बलात्कार
नागपूर: मुख्यमंत्र्यांचं नागपूर दिवसेंदिवस गुन्हेगारीचा अड्डा बनत असल्याचं समोर येत आहे. त्याचं आणखी एक क्रूर उदाहरण समोर आलं आहे. दिराने स्वत:च्या वहिनीचा आणि तीन वर्षीय पुतणीचा खून करुन, मृतदेहावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वासनांध दिराने नागपूर अमरावती महामार्गावरील वडधामना परिसरात राहणाऱ्या वहिनी आणि पुतणीची हत्या करुन त्यांच्यावर बलात्कार केला. पुतणी केवळ तीन वर्षांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी […]
नागपूर: मुख्यमंत्र्यांचं नागपूर दिवसेंदिवस गुन्हेगारीचा अड्डा बनत असल्याचं समोर येत आहे. त्याचं आणखी एक क्रूर उदाहरण समोर आलं आहे. दिराने स्वत:च्या वहिनीचा आणि तीन वर्षीय पुतणीचा खून करुन, मृतदेहावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
वासनांध दिराने नागपूर अमरावती महामार्गावरील वडधामना परिसरात राहणाऱ्या वहिनी आणि पुतणीची हत्या करुन त्यांच्यावर बलात्कार केला. पुतणी केवळ तीन वर्षांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम दिराला बेड्या ठोकल्या आहेत.
बुधवारी रात्री 35 वर्षीय प्रतिभा बिंद आणि त्यांची 3 वर्षीय मुलगी रागिणी बिंद यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस तपासात महिलेच्या दिराने वासनेपोटी हत्या करुन, मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चालक असलेला महिलेचा पती बाहेरगावी असल्याची संधी साधत, नराधम दिराने ही संधी साधली.