मुख्यमंत्री बनले भाऊराया, महिलांनी बांधली राखी…राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू
राज्यात मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांना सन्मान निधी मिळणार आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प काल सादर झाला. त्यात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजना’ लागू केल्याने त्यांना महिलांना राखी बांधली आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना कालच या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. आज विधीमंडळात या योजनेला लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिलांनी राखी बांधत अनोख्या पद्धतीने आभार मानले.
राज्यात मध्य प्रदेशच्या धर्तीवर ‘लाडकी बहिण योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांना सन्मान निधी मिळणार आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प काल सादर झाला. त्यात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत 21 ते 60 वयोगटातील महिलांना सरकार दरमहिन्याला 1,500 रुपये निधी देणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना लागू केली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होणार आहेत.
एसटीत महिलांना फायदा
राज्यात महिलांना एसटी महामंडळात अर्धे तिकीट योजना गेल्यावर्षी लागू झाली होती. यामुळे महिलांना एसटी प्रवास करताना मोठा फायदा झाला आहे. तरुणींना एसटी महामंडळ शिक्षणासाठी पदवीपर्यंत मोफत प्रवासाची सोय देते. त्यामुळे महिलांचे सबलीकरण करण्यासाठी मोठा फायदा होत आहे. एसटीत 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तर 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात येत आहे.