Nashik| लिंगभावात्मक संवेदनशीलता व्यक्तिमत्वात रुजावी; कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांचे आवाहन
लिंगभावात्मक संवेदनशीलता व्यक्तिमत्वात रुजायला हवी, असे आवाहन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर यांनी लिंगभावात्मक संवेदनशीलता विषयावर कार्यशाळेत केले.
नाशिकः लिंगभावात्मक संवेदनशीलता व्यक्तिमत्वात रुजायला हवी, असे आवाहन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर यांनी लिंगभावात्मक संवेदनशीलता विषयावर कार्यशाळेत केले. यावेळी पुण्याचे आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज येथील डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमधील मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना श्रीवास्तव यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला व्यासपीठावर कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक उपस्थित होते.
घरापासून सुरुवात करा
कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या, लिंगभावात्मक संवेदनशीलता ही आपल्या व्यक्तिमत्वात रुजायला हवी. आपल्या घरापासूनच याची सुरुवात करायला हवी. आपल्या कुटुंबातील व्यक्तींसमवेत वागताना आपण आपल्या मुलांसमोर कोणते आदर्श ठेवत आहोत, याविषयी सजगता बाळगणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष समानता आपल्या विचारांमध्ये आली तरच समाजात खऱ्या अर्थाने समानता निर्माण होईल. यासाठी स्त्री-पुरुष समानतेचा सर्वांनी जागर करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रगत आणि संवेदनशील समाजासाठी सामाजिक परिवर्तन घडणे गरजेचे आहे. समाजातील लैगिंकतेविषयी असलेला दृष्टिकोन व्यापक व्हावा. स्त्री-सबलीकरण, लिंगभावात्मक न्याय यासाठी विविध स्तरावर उल्लेखनी कार्य होत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने हातभार लावून उज्वल समाज घडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक दृष्टिकोन बदला
ऑनलाईन मार्गदर्शन करतांना ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कल्पना श्रीवास्तव यांनी म्हणाल्या की, सामाजिक विकास घडण्यासाठी लिंगभावात्मक दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुष हा लिंगभेद न करता मुलांना सारखीच वागणूक द्यावी. वेश, व्यवसाय, मागदर्शक तत्व यात भेदाभेद नसावी. विविध स्तरावर सामाजिक दृष्टिकोन बदलावा. जेणेकरुन लिंगभावाधारित हिंसेपासून जगाला मुक्त करणे गरजेचे आहे. आपल्या देशात प्रत्येक मुलाला लिंगभाव समानतापूर्ण शिकवण देणे आवश्यक असून यामध्ये लिंगभाव, समानता, हिंसा, नातेसंबंध हे विषय शिकवले जातात. आजवरच्या संशोधानुसार स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायांमध्ये पुरुषांचा सहभाग जास्त असल्याचे आढळते. याकरिता विविध कायदे अस्तीवात असून त्याचा योग्य उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
छेडछाडीचे प्रमाण वाढले
डॉ. कल्पना श्रीवास्तव पुढे म्हणाल्या की, आजकाल स्त्री- पुरुष समानता या विषयावर पुष्कळ चर्चा होताना दिसते. वरवर पाहता समाजामध्ये स्त्री पुरुष समानता आहे, असा आभासही होतो. मात्र, प्रत्यक्षात अजूनही समाजामध्ये छोट्या- छोट्या गोष्टींसाठी मुलींना खूप संघर्ष करावा लागत आहे. महिलांचा सहभाग विविध ठिकाणी आहे असे दिसते, पण तो सहभाग घेत असताना त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलींना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे छेडछाड. दिवसेंदिवस समाजामध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे त्यासाठी सर्वाना सजग राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड नियमांचे पालन
लिंगभावात्मक संवेदनशीलता जागृत ठेवण्यासाठीचा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयन उपकुलसचिव डॉ. उदयसिंह रावराणे यांनी केले. या कार्यक्रसाठी श्रीमती उज्वला पवार, श्री. राहुल विभंडिक, सुरेश शिंदे, नंदकिशोर वाघ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात कोविड-19 संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर बातम्याः
Omicronचा धसका | नाशिक महापालिकेकडून 2200 ऑक्सिजन बेड सज्ज, परदेशातून आलेल्या 289 जणांचा शोध सुरू