Audio Clip : मुख्यमंत्र्यांना 14 पत्रं लिहिली, बैठकही घेतली, पण उपसा सिंचन प्रकल्पाला बाळासाहेबांचं नाव नाय, तालुक्याला पैसा नाय; शहाजी बापूंची खदखद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे )यांच्याकडून नगरपालिकेच्या इमारतीसाठी १२ कोटींचा निधी मागितल होता, मात्र त्यावरही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलेले आहे. एकनाथ शिंदेंनी  मात्र कामे केली असा दावा त्यांनी या संभाषणात केला आहे. 

Audio Clip : मुख्यमंत्र्यांना 14 पत्रं लिहिली, बैठकही घेतली, पण उपसा सिंचन प्रकल्पाला बाळासाहेबांचं नाव नाय, तालुक्याला पैसा नाय; शहाजी बापूंची खदखद
आम्ही गद्दार नाही खुद्दार, टीका करणाऱ्यांना शाहजीबापू पाटलांच्या स्टाईनं प्रत्युत्तर, संजय राऊतांबाबत म्हणतात...Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 11:49 AM

मुंबई – शिवसेना आमदार शहाजीबापूंच्या (Shivsena MLA Shahajibapu)ऑडिओ क्लिपमध्ये मतदारसंघात कशा प्रकारे कामे होत नव्हती, याचे दुखणेच मांडलेले आहे. तालुक्याचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करताना आमदारांना सरकारच्या पतळीवर कसा अनुभव येत होता, हे त्यांनी कार्यकर्त्याला फोनवर सांगितले आहे. सांगोला उपसा सिंचन प्रकल्पाला हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे नाव द्यावे, यासाठी १४ पत्रे सरकारला पाठवली, मात्र त्याच्यावर काहीही उत्तर निघाले नाही, याची खंत त्यांनी या संभाषणात व्यक्त केली आहे. त्यांचा रोख जयंत पाटील यांच्या खात्याकडे होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्याकडून नगरपालिकेच्या इमारतीसाठी १२ कोटींचा निधी मागितल होता, मात्र त्यावरही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलेले आहे. एकनाथ शिंदेंनी  मात्र कामे केली असा दावा त्यांनी या संभाषणात केला आहे.

शहाजीबापू काय म्हणाले आहेत या संभाषणात

शहाजीबापू- अडीच वर्ष तुम्हाला सांगतो. तुमची जबाबदारी आहे. काय तालुक्याचा विकास होईल. आयला बघत राहावा, बघत राहावा तुमी. ऐतिहासिक विकास आपल्या तालुक्याचा होणार आहे. इतिहासाला आपल्या नावाची नोंद घ्यावी लागणार आहे. आता सुद्धा आपण भरपूर केलाय. अजून भरपूर कामी बाकी आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं बाकी आहे. अहो, अडीच वर्ष झालं ना फक्त. काय हाय लगा… पैसे आहेत का फंड आहेत का काय आहे वो…नुसतं सांगोला उपसा सिंचना योजना याला फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना हे नाव द्या. १३-१४ पत्रं मुख्यमंत्री कार्यालयाला झाली. त्या जयंतराव पाटील साहेब यांच्या कार्यालयाला झाली. त्याचा कोणी विचार करत नाही.

कार्यकर्ता- तुम्ही माग मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही बोलला ना…

हे सुद्धा वाचा

शहाजीबापू – स्पष्ट बोललो ना… साहेबांना काय खर्च होतूय. बरं दोन महिने झाले बैठक होऊन. आता तरी निर्णय कुठे आहे. त्या बैठकीत आपण बोललो. सर्व मुद्दे मांडले. साहेबांनी ऐकून घेतलं. पण रिझल्ट कुठे आहे.

शहाजीबापू – परवा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रं मागितले, ते पैसे मिळाले. मुख्यमंत्री साहेबांना नगरपालिकेच्या इमारतीचे १२ कोटी मागितले, त्याचं काय नाय. कायच व्हयना हो. फक्त तपासून अहवाल सादर करावा. तपासून अहवाल सादर करावा. ते गारगिल येतंय अन् साहेब खाली सही मारतंय. साहेबांची अशी ऑर्डर कुठाय, तातडीने अंमलबजावणी करावी. खाली उद्धव ठाकरे. धुरळा काढला असता आपण आतापर्यंत मतदारसंघात.

आमदारांच्या व्यथा मांडत केलेल्या बंडखोरीच समर्थन

मतदारसंघात काम करताना आमदारांना कशा प्रकारची वागणूक मिळत होती, याची अशी अनेक उदाहरणे या २० मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमध्ये आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीचा निर्णय़ का घेतला, याचे समर्थनच शहाजीबापू या संपूर्ण क्लिपमध्ये करताना दिसत होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.