Amravati | बंजारा समाजातल्या महिलांसोबत Yashomati Thakur यांनी धरला ठेका
अमरावतीच्या (Amravati) पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या दरवर्षी त्यांच्या निवासस्थानी बंजारा (Banjara) बांधवांसोबत होळी सण साजरा करत असतात. यंदाही ठाकूर यांनी बंजारा बांधवांसोबत होळी साजरी केली आहे.
अमरावतीच्या (Amravati) पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) या दरवर्षी त्यांच्या निवासस्थानी बंजारा (Banjara) बांधवांसोबत होळी सण साजरा करत असतात. यंदाही ठाकूर यांनी बंजारा बांधवांसोबत होळी साजरी केली आहे. आज धुलीवंदनाच्या दिवशी बंजारा समाज बंधु भगिणींसोबत आपल्या निवासस्थानी होळी साजरी करत त्यांनी बंजारा नृत्यावर ठेका धरला. यावेळी त्यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक बंजारा बंधू भगिनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मनसोक्त डान्स केला. बंजारा महिला भगिणी तर होत्याच मात्र सोबत वाद्यवृंददेखील होते. म्हणजेच यशोमती ठाकूर यांनी वाद्यांच्या तालावर डान्स केला. या महिलांसोबत ठेका धरला. यशोमती ठाकूर यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या.