Yashomati Thakur : यशोमती ठाकुरांना फोन करून धमकावणारा तो भाजप नेता कोण? म्हणाल्या ईडी, सीबीआय, किंवा बंदूक….
एका भाजप नेत्याने थेट धमकीसाठी फोन केल्याची माहिती यशोमती ठाकूर यांना दिलीय. त्यामुळे राज्यातल्या एका माजी मंत्राला आणि काँग्रेसचे एका बड्या नेत्याला अशी धमकी देणारा तो भाजप नेता कोण? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात उपस्थित झालाय.
अमरावती : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या चौकशीवरून आणि अटकेनंतर (ED arrested Sanjay Raut) राज्यात मोठा पॉलिटिकल राडा सुरू झालाय. राज्यातला जवळपास डझ भर नेत्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमीरा आहे. त्याचा आता शिंदे गटात गेलेले काही नेतेही सामील होते. मात्र राज्यात सत्तांतर होऊन एका महिन्याच्या आत संजय राऊत यांना झालेली अटक आणि त्यानंतरच सुरू झालेलं राजकीय नाट्य अजून संपलेलं नाही. त्यातच आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. त्यांना एका भाजप नेत्याने थेट धमकीसाठी फोन केल्याची माहिती यशोमती ठाकूर यांना दिलीय. त्यामुळे राज्यातल्या एका माजी मंत्राला आणि काँग्रेसचे एका बड्या नेत्याला अशी धमकी देणारा तो भाजप नेता कोण? असा सवाल सध्या राज्याच्या राजकारणात उपस्थित झालाय.
याबाबत यशोमती ठाकूर म्हणाल्या…
या खळबळजनक प्रकाराबद्दल बोलताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या मी सत्तांतराच्या वेळी बोलली, तेव्हा मला भाजपच्या मोठ्या नेत्याचा फोन आला आणि बोलले असं तुम्ही बोलणं बरोबर नाही. तर त्यावेळी मी त्यांना म्हटलं धमकी देत आहे का? जे सत्तेत बसले आहेत. ते दोनच काम करू शकतात, एक तुमच्यावर ईडी किंवा सीबीआयची चौकशी लावू शकतात. नाहीतर बंधूक घेऊन मारून टाकू शकतात. असा गंभीर आरोप यावेळी यशोमती ठाकूर यांनी केलाय. त्यांनी पानसरेंना कसे मारून टाकलं, दाभोळकरांना कसं मारून टाकलं याची उदाहरणेही दिली आहेत. त्यामुळे त्यांचा रोख याबाबतीत नेमका कुणाकडे आहे? असाही सवाल विचारण्यात येत आहे.
सत्तांत्तर झाल्यावर भाजपवर अनेक गंभीर आरोप
राज्यात जेव्हापासून सत्तांतर झालंय आणि एकनाथ शिंदे यांचं बंड होऊन ठाकरे सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आलंय. तेव्हापासून महाविकास आघाडीचे नेते रोज एकनाथ शिंदेंवर आणि भाजप नेत्यांवर आरोप करत आहेत. तसेच ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला घाबरूनच हे पन्नास आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. अनेक नेत्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयच्या चौकशी लावून त्यांना भाजपमध्ये नेलं जाते. तसेच भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चौकशा पूर्णपणे बंद होत आहेत. विरोधकांची तोंडं बंद करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकण्याचे काम ईडी आणि सीबीआय भाजपसाठी करत असल्याचा आरोप सातत्याने होत असतानाच आता यशोमती ठाकूर यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्याने पुन्हा एकदा राज्यातलं राजकारण तापणार आहे एवढं मात्र नक्की.