Yavatmal | आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेच्या प्रसूती प्रकरणी, 2 कंत्राटी डॉक्टरांसह 4 जणांवर कारवाई…
महिलेला वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्याने गेटवरच महिलेची प्रसुती आणि यामध्ये बाळ दगावले. यादरम्यान आरोग्य केंद्रांत एकही कर्मचारी नसल्याने संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणी चौकशी समिती नेमून आज अहवाल देण्यात आलायं.
यवतमाळ : दोन दिवसांपूर्वी यवतमाळ येथे एक धक्कादायक (Shocking) घटना घडली होती. एका महिलेची प्रसुती चक्क आरोग्य केंद्राच्या गेटवरच झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यवतमाळ (Yavatmal) तालुक्याच्या उमरखेड येथील विडुळ आरोग्य केंद्रावर ही घटना घडली होती. प्राथमिक केंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने महिलेची गेटवरच प्रसुती झाली आणि यामध्ये नवजात बाळ दगावले. यानंतर जिल्हात एकच खळबळ उडाली. या संपूर्ण घटनेनंतर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कारवाई (Action) करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
आरोग्य केंद्रांत एकही कर्मचारी नसल्याने महिलेची गेटवरच प्रसुती
महिलेला वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्याने गेटवरच महिलेची प्रसुती आणि यामध्ये बाळ दगावले. यादरम्यान आरोग्य केंद्रांत एकही कर्मचारी नसल्याने संतापाची लाट निर्माण झाली होती. या प्रकरणी चौकशी समिती नेमून आज अहवाल देण्यात आलायं. यामध्ये आरोग्य विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सहा जणांना सेवेतून निलंबित केले आहे. इतकेच नाही तर तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांना देखील नोटीस पाठवलीयं.
प्रसुतीमध्ये बाळ दगावल्याने एकच खळबळ
या संपूर्ण प्रकरणी 2 कंत्राटी डॉक्टरांना सेवामुक्त करण्याचे आदेश आरोग्य विभागाने जारी केले आहेत. तसेच कंत्राटी आरोग्य सेविका यांना देखील सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणी अजून 4 जणांना निलंबित करण्यात आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुनेश्वर यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.