Chandrasekhar Bavankule | अमोल मिटकरींकडून धार्मिक वातावरण बिघडविण्याचे काम, यवतमाळात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ब्राम्हण समाजाची माफी मागावी

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे राज्याची संस्कृती बिघडविण्याचं काम करत आहेत. धार्मिक वातावरण बिघडविण्याचं काम करत आहेत. त्यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Chandrasekhar Bavankule | अमोल मिटकरींकडून धार्मिक वातावरण बिघडविण्याचे काम, यवतमाळात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ब्राम्हण समाजाची माफी मागावी
आमदार चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 5:23 PM

यवतमाळ : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्राची संस्कृती (Culture of Maharashtra) जपली पाहिजे. ते नेहमीच द्वेष भावनेने वायफळ बोलत असतात. ब्राम्हण समाजाबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. एखाद्या समाजाबद्दल बोलणे जातीयवादी बोलून महाराष्ट्रातील सांस्कृतिक, धार्मिक वातावरण बिघडविण्याचं काम योग्य नाही. अमोल मिटकरी हे नवीन आहेत. सभागृहातदेखील नवीन आहेत. त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे राज्याची संस्कृती बिघडविण्याचं काम करत आहेत. धार्मिक वातावरण बिघडविण्याचं काम करत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

अमोल मिटकरी यांनी सांगली येथील एका सभेत लग्नातील विधीतील श्लोक म्हणून दाखविला. हनुमान चालीसाही म्हणून दाखविला. देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, यांची नक्कल करून दाखविली. उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केलं. पण, जोशात येऊन कन्यादानावरून भलतच वक्तव्य केलंय. लग्नातील विधीबाबत मिटकरी बोलत असताना उपस्थितांना हसू आवरलं नाही. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे त्याठिकाणी होते. ते पोटभरून हसले. पण, हिंदुत्ववादी संघटनांनी मिटकरींच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला. ब्राम्हण महासंघही मिटकरींवर तुटून पडला.

भाजपची बैठक संघटनात्मक

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठरल्याप्रमाणे राष्ट्रीय संघटन मंत्री यांची आजची भाजपची बैठक संघटनात्मक होती. या सरकारने विदर्भावर अन्याय केला आहे. सरकार विरोधात वातावरण विदर्भात आहे. आगामी काळामध्ये सरकारला कसे उत्तर द्यावे. या सरकार विरोधात कसे काम करावे यासाठी बैठक होती. आगामी काळात आंदोलन करणे आणि पक्ष प्रवेश करणे पक्ष बांधणीसाठी ही बैठक असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

NCP Amol Mitkari : राष्ट्रवादीत चाललंय काय? अमोल मिटकरींच्या ज्या वक्तव्याला जयंत पाटील, धनंजय मुंडेंची दिलखुलास दाद, त्यावर राष्ट्रवादीचाच नेता म्हणतो, माफी माग

NCP Amol Mitkari : मिटकरीला माफी तर मागावीच लागेल, राष्ट्रवादीच्या परळीतल्या नेत्याची जाहीर पोस्ट, आमदारकीवरही भाष्य

Raj Thackeray | विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू, औरंगाबादेत मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रेंचा इशारा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.