Video Yavatmal Dog | वणीतील रॅलीत कुत्रा भगव्या वस्त्रात; विजय चोरडियांच्या कुत्र्याचा भगव्या वस्त्रात सहभाग

वणीतील रामनवमीच्या रॅलीमध्ये विजय चोरडिया यांनी घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करून आणले होते. हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यातून चोरडिया यांना कोणता संदेश द्यायचाय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Video Yavatmal Dog | वणीतील रॅलीत कुत्रा भगव्या वस्त्रात; विजय चोरडियांच्या कुत्र्याचा भगव्या वस्त्रात सहभाग
वणीतील रामनवमीच्या रॅलीमध्ये विजय चोरडिया यांनी घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करून आणले होते.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:39 PM

यवतमाळ : जिल्ह्यातील वणीतील रामनवमीत वेगळंच चित्र दिसलं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. रामनवमी समितीचे अध्यक्ष विजय चोरडिया (Vijay Chordia) यांनी स्वतः भगवे (Saffron) वस्त्र परिधान केले होते. कार्यकर्तेही भगवे वस्त्रात होते. तुम्ही म्हणाय यात काय विशेष. विशेष म्हणजे विजय चोरडिया यांनी आपल्या घरच्या कुत्र्यालाही भगवे वस्त्र (Clothing) परिधान करून दिले होते. रॅलीत ढोलताशे वाजत होते. जोरदार आवाज येते होता. चोरडिया यांच्या घरचा कुत्रा आपली शेपटी हलवित होता. गाण्याच्या तालावर दुडूदुडू चालत होता. जणू काही रॅलीमध्ये नाचत होता. जीभ बाहेर काढून उन्हापासून थंड होण्यासाठी शितली प्राणायम जणू करत होता. रॅलीत सहभागी झालेल्या कुत्र्याचा पट्टा विजय चोरडिया यांनी काढून टाकला. त्यामुळं तो बिनधास्त होता. विशेष म्हणजे कुत्र्याच्या गळ्याचा पट्टाची भगव्या रंगाचा होता.

वागणुकीवर टीका

विजय चोरडिया हे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच ते रामनवमी समितीचे अध्यक्ष आहेत. रॅलीत वणीमध्ये चक्क आपल्या घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र परिधान करून शोभा यात्रेला आणले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. राज्यात हिंदुत्वावरुन राजकारण पेटत असताना भाजपच्या नेत्याने घरच्या कुत्र्याला भगवे वस्त्र घालून यात्रेत आणून नेमका काय संदेश दिला. हा सवाल उपस्थित केला जातोय. त्यांच्या अशा पद्धतीची वागणुकीवर टीका केली जात आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. यातून चोरडिया यांना कोणता संदेश द्यायचाय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

पाहा व्हिडीओ

Sunil Mendhe | नाना पटोलेंचे कार्यकर्ते धान घोटाळ्यात सहभागी? भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांचा गौप्यस्फोट, सीबीआय चौकशी होणार

Buldana | आमदार संजय कुटे यांचे शेगाव पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप, विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का?

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.