AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Fraud : यवतमाळ कलकाम रियल इन्फ्राकडून गुंतवणूकदारांची दोन कोटींची फसवणूक

काही महिन्यात कंपनीने 100 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये देखील कलकामने आपल्या कंपनीच्या प्रचार व प्रसार करून शेकडो गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. यामध्ये 267 ग्राहकांची 2 कोटी 10 लाख 213 रुपयांची फसवणूक केली.

Yavatmal Fraud : यवतमाळ कलकाम रियल इन्फ्राकडून गुंतवणूकदारांची दोन कोटींची फसवणूक
यवतमाळ कलकाम रियल इन्फ्राकडून गुंतवणूकदारांची दोन कोटींची फसवणूकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 9:20 PM
Share

यवतमाळ : तीन पट रक्कम देण्याचे आमिष देऊन कलकाम रियल इन्फ्रा कंपनी लिमिटेड या कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची दोन कोटींची फसवणूक (Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी गुंतवणूकदारां (Investors)नी अवधूत वाडी पोलिसात आठ जणांविरोधात तक्रार (Complain) दाखल केली आहे. मुंबई येथील विष्णू दळवी रा वाशी, विजय सुपेकर, सुनील वांद्रे, विदेश रामटेके, विजय येरगुडे, दिलीप भोसले, अजय जावडेकर, सचिन पवार, रवी सातपुते अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 8 जणांची नावे आहेत. याप्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

267 ग्राहकांची 2 कोटी 10 लाख 213 रुपयांची फसवणूक

कलकाम रिअल ईनफा (ई) लिमिटेड कंपनीमधील आठ ते दहा जणांनी विदर्भामध्ये कार्यक्रम घेऊन कंपनीमध्ये गंतवणूक करण्यासाठी ग्राहकाला प्रोत्साहित केले. ग्राहकांना गुंतवलेल्या रकमेवर ठाराविक दिवसानंतर तीन पट अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखविण्यात आले. तसेच कंपनीने बॉन्ड देखील दिले आहे. काही महिन्यात कंपनीने 100 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये देखील कलकामने आपल्या कंपनीच्या प्रचार व प्रसार करून शेकडो गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. यामध्ये 267 ग्राहकांची 2 कोटी 10 लाख 213 रुपयांची फसवणूक केली.

मुदत उलटूनही सदर कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ

दरम्यान, आज मुदत उलटूनही सदर कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. गेल्या 2 वर्षापासून फसवणूक झालेले लोक कंपनीच्या मागे फिरत आहे. त्यानंतर आज या कंपनीत काम करणाऱ्या एजंट आणि ग्राहकांनी संबंधित कंपनी विरुद्ध तक्रार दिली आहे. या तक्रारीची चौकशी करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे याकरीता, पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. पै पै गोळा करून लोकांनी पैसे व्याजदर जास्त मिळण्याच्या लोभापोटी लाखो रुपये यात गुंतवले आहेत. मात्र हे पैसे घेऊन कंपनीने पोबारा केला आहे. कमी गुंतवणुकीमध्ये जास्त व्याजदराचे आमिष देणाऱ्या अनेक कंपन्या सध्या राजरोसपणे सर्वसामान्य लोकांना फसवत आहेत. त्यामुळे ह्या नेटवर्क मार्केटिंग जाळ्यात फसण्याआधी नागरिकांनी शहानिशा करणे गरजेचे आहे आणि सावधान राहणे गरजेचे आहे. अन्यथा आपली सुद्धा फसवणूक होऊ शकते. (Investors cheated of Rs 2 crore by Yavatmal Kalkam Real Infra)

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.