VIDEO | Yavatmal मध्ये विवाह मंडप आकाशात उडाला, पाहुण्यांची पळापळ, आनंदावर विरजण

विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाला. विवाह सुरु असतानाच अचानक वादळाने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला.

VIDEO | Yavatmal मध्ये विवाह मंडप आकाशात उडाला, पाहुण्यांची पळापळ, आनंदावर विरजण
यवतमाळमध्ये लग्न मंडप आकाशात उडालाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 8:15 AM

यवतमाळ : पाहुण्यांनी भरलेला विवाहाचा मंडप (Wedding Mandap) अचानक आकाशात उडाला. यवतमाळ (Yavatmal) तालुक्यातील भांब (राजा) येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी एका विवाह सोहळ्याचे (Marriage Ceremony) मोठ्या थाटात आयोजन करण्यात आलं होतं. भव्य विवाह मंडप पाहुण्यांनी गच्च भरला होता, लग्नाचे विधी करण्यास सुरुवात झाली आणि विवाह सुरु असतानाच अचानक वादळाने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला. यावेळी पाहुण्यांची तारांबळ उडून चिमुकली जखमी झाली आहे, तर एक-एक महिला आणि पुरुषही दुखापतग्रस्त झाले आहेत. मंडप संचालकांनी वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली.

नेमकं काय घडलं?

विवाहाचा मंडप अचानक आकाशात उडाल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळाला. विवाह सुरु असतानाच अचानक वादळाने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर पाहता पाहता विवाहाचा मंडप आकाशात उडाला.

चिमुकली जखमी, महिला बेशुद्ध

यावेळी एकच हलकल्लोळ उडाला. वऱ्हाडाची पळापळ सुरु झाली. कुणी कुणाच्या अंगावर लाथा देत पळत होते. यात पाच वर्षांच्या चिमुकलीला इजा झाली, तर एक महिला आणि एक पुरुष जखमी झाले आहेत. एक वऱ्हाडी महिला बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

मंडपाचा काही भाग विद्युत तारेवर अडकला तर काही गावातील घरांवर जाऊन पडला. मंडपाला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून पडले. मंडप संचालकांनी वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली.

उपाशीपोटी वऱ्हाडी परतले

यावेळचे हे चित्र अत्यंत भयावह होते. कुणी कुणाला तुडवत स्वतःचा जीव वाचवण्याची प्रयत्न करत होते. या विवाहाला जवळपास चारशेहून अधिक वऱ्हाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. पाहुण्यांसाठी तयार केलेले जेवण एकाच्याही पोटात गेले नाही. सर्वांना उपाशी पोटीच परतावे लागले.

हे वऱ्हाड आरंभी येथून भांब राजा येथे मोहन दगडू राठोड यांच्या मुलीच्या विवाहासाठी आले होते. मात्र अचानक आलेल्या वादळाने आनंदावर विरजण पडले. जिथे तिथे या घटनेची चर्चा सुरु आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO : अजब लग्नाची गजब गोष्ट, वरात पाहून लोक म्हणतात हेच आहे आयुष्याचे सत्य!

VIDEO : लग्न मंडपामध्ये येणाऱ्या नवरीला पाहून नवरदेवाला आली चक्कर, पुढे काय झाले पाहा व्हिडीओमध्ये!

Viral video : लग्नात सजावटीसाठी ठेवले होते कारंजे, बघा लोकांनी त्याचा उपयोग कसा करून घेतला…

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.