शिवथाळीची ऐशी-तैशी..! चक्क शौचालयात धुतली जात आहेत भांडी, संतापजनक Video viral
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जात आहे, ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार एका व्हायरल (Viral) व्हिडिओच्या (Video) माध्यमातून पुढे आला आहे.
यवतमाळ : ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्या नंतर ते उपाशी राहू नये, यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन (Shiv thali bhojan) सुरू केले. मात्र यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जात आहे, ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार एका व्हायरल (Viral) व्हिडिओच्या (Video) माध्यमातून पुढे आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाशी संबंधित महिलेचे हे शिवथाळी भोजनकेंद्र असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या हेतूला हरताळ फसला जात असल्याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर अशा किळसवाणा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
आता कारवाईकडे लक्ष
अशाप्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडविली जात आहे. आता या शिवथळी केंद्र चालकांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#Yavatmal : शिवथाळी केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी थाळी नंतर शौचालयातल्या पाण्यानं धुतली जात आहे. यवतमाळातील महागाव येथील शिवथाळी केंद्रातल्या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालाय. #shivthali #maharashtranews #ViralVideo pic.twitter.com/xaxl2o4nXN
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2022
जागरूकता गरजेची
एका केंद्रावरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती सर्वांसमोर आली. मात्र अनेक ठिकाणी गलिच्छ प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. कोणताही चुकीचा प्रकार आढळल्यास त्याची तक्रारही करायला हवी, जेणेकरून असे फसवले जाणार नाही.