घरी परतत होता पोलीस कर्मचारी, दबा धरून बसलेल्या दोघांकडून मारहाण

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिली.

घरी परतत होता पोलीस कर्मचारी, दबा धरून बसलेल्या दोघांकडून मारहाण
मुख्यालयाच्या गेटसमोर पोलीस कर्मचाऱ्याचा खूनImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 5:56 PM

यवतमाळ : पोलीस मुख्यालयाच्या परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याचा जुन्या वादातून खून करण्यात आला. हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने वार करण्यात आले. ही घटना यवतमाळ पोलीस मुख्यालयाच्या गेटसमोर घडली. निशांत खडसे (Nishant Khadse) असं मृतक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस बँड पथकात (Police Band Squad) निशांत खडसे कार्यरत आहेत. ते याच पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते.

हॉकी स्टीक, लोखंडी रॉडने हल्ला

काल निशांत यांनी अंगणवाडी सेविकांच्या मोर्च्यात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावले. त्यानंतर थेट पोलीस मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एक बारमध्ये गेले. तिथून मद्यप्राशन करून ते मुख्यालय परिसरातील आपल्या घरी परतत होते. त्याच वेळी आधीच दबा धरून बसलेल्या 2 जणांनी त्यांच्यावर हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने हल्ला केला.

मित्रांनीच काढला काटा

हे हल्लेखोर दुसरे तिसरे कोणी नाही तर निशांतचे रोजचे मित्र होते. आरोपी कुंदन मेश्राम, अभिषेक बोंडे रोज निशांतला भेटणारे मित्र होते. या तिघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र निशांत हा मुख्य आरोपी असलेल्या अभिषेक बोंडे याला हीन दर्जाची वागणूक देत होता. त्याला क्षुल्लक कारणावरून मारहाण करत होता. वेळोवेळी अपमान करत होता. ही सल अभिषेकच्या मनात सलत होती. त्याचमुळे निशांतचा काटा काढायचा ठरवले.

हे सुद्धा वाचा

मद्यप्राशन करून मारहाण

नेहमीप्रमाणे निशांतला आपल्या कट्ट्यावर बोलवले. हे तिघेही शिवनाथ बारमध्ये मद्यप्राशन करण्यास गेले. तिथं दारू पिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या बारमध्ये मोर्चा वळविला. पुन्हा त्या ठिकाणी दारू पिल्यानंतर मुख्य आरोपी अभिषेक बोंडे हा सर्वात आधी वसाहतीकडे गेला.

पोलिसांची घटनास्थळी धाव

हॉकी स्टिक, रॉड वसाहतीच्या या गेटजवळ आणून ठेवले. निशांतची वाट पाहत होता. निशांत गेटजवळ येताच त्याच्याशी मुद्दाम वाद घातला. तयारीनिशी असलेल्या अभिषेकने निशांतवर हल्ला चढविला. या हल्ल्यात निशांत हा जागीच ठार झाला. निशांतचा मृतदेह तिथं पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

दोन्ही आरोपींना अटक

निशांतचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिली. या प्रकरणी तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.