Yavatmal Murder : अनैतिक संबंधातून प्राध्यापकाची हत्या, पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपविले, दोघेही दिग्रस पोलिसांच्या जाळ्यात

पत्नी वनविभागात अकोट येथे नोकरीवर होती. पती उमरखेड येथे प्राध्यापक होता. दोघांच्या भेटीगाठी कमी व्हायच्या. इकडं पत्नीचे वनविभागातील एका कर्मचाऱ्यावर प्रेम जडलं.

Yavatmal Murder : अनैतिक संबंधातून प्राध्यापकाची हत्या, पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपविले, दोघेही दिग्रस पोलिसांच्या जाळ्यात
बंगुळुरुमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:01 PM

यवतमाळ : जिल्ह्याच्या उमरखेड (Umarkhed) येथील एका प्राध्यापकांचा मृतदेह दिग्रस जवळच्या सिंगद येथे आढळला. या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. शेवटी मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे पुढे आले. त्यावरून आता पोलिसांनी तपास करून मृतकाची पत्नी तिच्या प्रियकराला अटक केली. सचिन वसंत देशमुख हा उमरखेड येथील कृषी महाविद्यालयात (College of Agriculture) प्राध्यापक होता. तर त्याची पत्नी धनश्री ही अकोट इथ वन विभागात नोकरीला आहे. त्यामुळे सचिन हा पत्नीला भेटण्यासाठी अकोटला गेला. मात्र 5 दिवसांनंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांना दिग्रसजवळ (Digras Police) क्या सिंगद येथील पुलाखाली सचिन देशमुख याचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली.

पत्नी व तिच्या प्रियकराला अटक

शवविच्छेदनानंतर सचिनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या आधारे सचिनची पत्नी आणि तिचा प्रियकर केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले. दिग्रस पोलिसांनी मृतकाची पत्नी धनश्री आणि वन विभागातील कर्मचारी असलेला तिचा प्रियकर शिवम बचके या दोघांनाही अटक केली. त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अनैतिक संबंधातून धनश्रीने प्रियकराच्या मदतीने पती सचिनला संपविल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. या प्रकरणाने उमरखेड तालुका हादरून गेला.

नेमकं काय घडलं?

पत्नी वनविभागात अकोट येथे नोकरीवर होती. पती उमरखेड येथे प्राध्यापक होता. दोघांच्या भेटीगाठी कमी व्हावच्या. इकडं पत्नीचे वनविभागातील एका कर्मचाऱ्यावर प्रेम जडलं. पती तिला भेटायला आला. पण, इकडं पत्नीनं प्रियकरासोबत त्यालाचं संपविलं. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी दिली. खून केल्यानंतर अपघाताचा बणाव करण्यात आला होता. पण, शवविच्छेदन अहवालात खून केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर दिग्रस पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यात पत्नी व तिचा प्रियकर दोषी असल्याचं निष्पन्न झालंय.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.