AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Trees | नागपूर-तुळजापूर मार्गावरील 35 हजार झाडं गेली कुठं, सामाजिक कार्यकर्त्यांची अवधूत वाडी पोलिसांत तक्रार

यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दीतील 81 झाडे कापल्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला 800 झाड लावायचे होते. मात्र त्यांनी ते लावले नाही. बाबत तक्रारी आल्याने नगर परिषदेने त्यांना पत्रही दिले. झाडं जीवंत असल्याचे पुरावे मागितले. मात्र अजूनही त्या बाबत पुरावे देण्यात आले नाही.

Yavatmal Trees | नागपूर-तुळजापूर मार्गावरील 35 हजार झाडं गेली कुठं, सामाजिक कार्यकर्त्यांची अवधूत वाडी पोलिसांत तक्रार
नागपूर-तुळजापूर मार्गावरील 35 हजार झाडं गेली कुठंImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 10:37 AM
Share

यवतमाळ : नागपूर – यवतमाळ – तुळजापूर या राज्य महामार्गावर 35 हजार 294 झाडे लावण्यात आली होती. मात्र आता ही झाडं कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे यवतमाळच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने (Social Worker) झाडे चोरीला गेल्याची तक्रार अवधूत वाडी पोलीस ( Avadhut Wadi Police) ठाण्यात दिली. यामुळे खळबळ उडाली असून, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यवतमाळ ते नागपूर या राज्य महामार्गावर 100 वर्षे जुनी झाडं होती. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सावली मिळत होती. मात्र नागपूर-तुळजापूर हा राज्य महामार्ग नव्याने तयार करताना ही सर्व झाडे तोडण्यात आली. त्यांच प्रमाणे पांढरकवडा इथं जाण्यासाठी एका पुलाची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी अडसर ठरणाऱ्या 81 झाडे कापण्याची परवानगी यवतमाळ नगर परिषदेला (Yavatmal Municipal Council) मागण्यात आली. ही झाडे कापली. मात्र त्या बदल्यात एकही झाड लावण्यात आले नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 35 हजार 294 झाडं लावल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला कुठेही झाड दिसत नाही. त्यामुळे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता कुलकर्णी यांनी झाडं चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली.

झाडं कापली, पण लावलीच नाही

नागपूर-तुळजापूर या मार्गावर ब्रिटिश काळातील अनेक वृक्ष होती. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राहत होते. एवढेच नव्हे तर रस्त्याने जाणारे लाही झाडाची सावली मिळत होती. मात्रा आता 100 वर्षे जुनी झाड कापल्याने वृक्ष प्रेमी संतप्त झालेत. त्यांनी नवीन वृक्ष लागवड करण्याची मागणी केली. यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दीतील 81 झाडे कापल्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला 800 झाड लावायचे होते. मात्र त्यांनी ते लावले नाही. बाबत तक्रारी आल्याने नगर परिषदेने त्यांना पत्रही दिले. झाडं जीवंत असल्याचे पुरावे मागितले. मात्र अजूनही त्या बाबत पुरावे देण्यात आले नाही.

पोलीस चौकशी करणार

नागपूर-तुळजापूर या मार्गावर 35 हजार 294 झाडं लावण्यात आली. परंतु झाडं कुठेही दिसत नसल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने वृक्ष चोरीला गेल्याची पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलीस चौकशी करणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली. 35 हजार वृक्ष चोरीला गेले, ही बाब आश्चर्यकारक आहे. तेवढीच धक्कादायकही आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होणार याकडे वृक्ष प्रेमींसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.