ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झाले तरीही पाण्यासाठी बोंबाबोंब, संतप्त महिलांनी नप कार्यालयाचे कुलूप का फोडले?

दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत आहे. आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालयाचे कुलूप हातोड्याने फोडत नगरपंचायतमध्ये राडा केला.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झाले तरीही पाण्यासाठी बोंबाबोंब, संतप्त महिलांनी नप कार्यालयाचे कुलूप का फोडले?
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 3:34 PM

विवेक गावंडे, प्रतिनिधी, यवतमाळ : उन्हाळा असल्याने पाण्याची जास्त गरज आहे. परंतु, ढाणकीत पाणीसमस्येने उग्र रूप धारण केले. महिलांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते. नगरपंचायतीमध्ये गेल्यानंतर तिथं विभाग प्रमुख कधी प्रभारावर असल्याचे सांगतात. तर बहुधा उपस्थित राहत नाही. तक्रार कुणाकडं करावी, असा प्रश्न निर्माण होत होता. शिवाय तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संतप्त महिलांना आज नगरपंचायत कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले. दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत आहे. आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला. संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालयाचे कुलूप हातोड्याने फोडत नगरपंचायतमध्ये राडा केला. संपूर्ण उन्हाळाभर शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत होता.

या भागातील महिला संतप्त

आता उन्हाळा संपून पावसाची प्रतीक्षा असतानाही 20 दिवस पाणीपुरवठा होत नाही. यावर नगरपंचायत प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. ही समस्या सांगण्यासाठी कार्यालयात गेल्यास विभाग प्रमुख हजर राहत नाहीत, असा महिलांचा आरोप आहे. प्रभाग क्रमांक 10, 11, 12, 16 मधील महिला संतप्त झाल्या.

हे सुद्धा वाचा

यांनी ऐकून घेतल्या समस्या

आपल्या लहान मुलांसह त्या नगरपंचायत कार्यालयावर धडकल्या. संतप्त महिलांचा राग शांत करण्यासाठी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक शेख खाजा शेख कुरेशी हे महिलांना सामोरे गेले. त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून यावर निश्चितच नगरपंचायत प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले. यामुळे संतप्त महिलांचा राग काही वेळ निवळला.

विभाग प्रमुखांनी नेहमी गैरहजेरी

ढाणकी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. मात्र समस्या जैसे थेच आहेत. आजही शहराला पूर्णपणे पाणी उपलब्ध होत नाही. कार्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख हे प्रभागावर आहेत. शहरात कोणतीही विकास काम सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला आरोग्य आणि पाणी या विभागाच्या प्रमुख कार्यालयात सतत गैरहजर राहतात. त्यामुळे या समस्यांनी उग्ररूप धारण केले आहे.

समस्या मांडण्यासाठी नागरिक कार्यालयात आल्यास केव्हाच विभाग प्रमुख हजर राहत नाहीत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तातडीने शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी संतप्त महिलांची मागणी होती.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....