AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन हेलिकॉप्टरचा प्रयत्न फसला, बोटीने रेस्क्यू ऑपरेशन, यवतमाळध्ये बचाव कार्याचा थरार

यवतमाळमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी हवाई दलाचं हेलिकॉप्टरला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं. पण खराब वातावरण आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य शक्य होऊ शकलं नाही.

दोन हेलिकॉप्टरचा प्रयत्न फसला, बोटीने रेस्क्यू ऑपरेशन, यवतमाळध्ये बचाव कार्याचा थरार
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 3:09 PM

यवतमाळ | 22 जुलै 2023 : यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 240 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पूस आणि पैनगंगा नदीला पूर आलाय. त्याचा फटका आनंदनगर महागावला बसला आहे. हे गाव नदी तिरावर आहे. या ठिकाणी पूस आणि पैनगंगा नदीचा संगम आहे. तसेच तिथे एक नालादेखील आहे. त्यामुळे गावात पाणी शिरलंय. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे घरादारात पाणी शिरलं, यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. त्यांनी प्रशासनाची मदत मागितली. पण नदीच्या पाण्याला प्रवाह जास्त आहे. याशिवाय रस्ता पूर्ण पाण्याखाली गेलाय. त्यामुळे बचावकार्य करणं अशक्य बनलंय.

या दरम्यान दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळमध्ये अडकलेल्या 80 गावकऱ्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढू. त्यांचं सुरक्षित रेस्क्यू केलं जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. त्यानंतर लगेच थोड्या वेळाने यवतमाळमध्ये हवाई दलाचं हेलिकॉप्टर पोहोचलं. या दरम्यान पाऊस थांबला. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला. असं असलं तरी नदीच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे अडकलेल्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा

दोन वेळा प्रयत्न, पण दोन्ही प्रयत्न फसले

हवाई दलाचं हेलिकॉप्टर खडकी येथे महामार्गावर उतरलं. त्यानंतर हे हेलिकॉप्टर आनंदनगर महागावच्या दिशेला निघालं. या हेलिकॉप्टरने गावच्या चारही बाजूने घिरट्या मारल्या. पण हेलिकॉप्टरला लँड होण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली नाही त्यामुळे हे हेलिकॉप्टर परत माघारी फिरलं. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी आलं. पण तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे ते खाली येऊ शकलं नाही. अडकलेल्या नागरिकांमध्ये लहान मुलं, वृद्ध, महिला यांचा समावेश आहे. त्यामुळे धाकधूक वाढली.

बोटीने बचावकार्य सुरु

या दरम्यान एनडीआरएफचं एक पथक बोटीच्या साहाय्याने आनंदनगर महागावच्या दिशेला निघालं. या पथकाकडून बचावकार्याला सुरुवात झाली. आता या सर्व गावकऱ्याचं बोटीतून सुरक्षित रेस्क्यू केलं जात आहे. गावकरी सकाळपासून उपाशी आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणाची देखील व्यवस्था केली जाणार आहे. पण प्रशासनासाठी हे बचावकार्य खूप आव्हानात्मक आहे. या बचावकार्यादरम्यान पावसाने काही काळ उसंत घेतल्याने बचावकार्यातील अडथळे काहीसे कमी झाले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातही पूर

यवतमाळ पाठोपाठ बुलढाणा जिल्ह्यातही काही गावांमध्ये पूर आला आहे. बुलढाण्यात संग्रामपूर तालुक्यात पांडव नदीला पूर आलाय. त्यामुळे काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. याशिवाय जळगाव जामोद येथे देखील शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. दरम्यान, पुरात अडकलेल्या जवळपास 100 पेक्षा जास्त नागरिकांना प्रशासनाने रेस्क्यू करुन सुरक्षित स्थळी नेलं आहे.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...