VIDEO | बाहेर जाऊ नकोस, कोरोना होईल, आजीचा पदर धरत चिमुकलीची आर्त हाक

आजीचा पदर धरुन रडत समजवणाऱ्या यवतमाळच्या चिमुकल्या सावी गावंडेचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. (Yawatmal Girl Corona Video Viral)

VIDEO | बाहेर जाऊ नकोस, कोरोना होईल, आजीचा पदर धरत चिमुकलीची आर्त हाक
यवतमाळमधील मुलीचा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 4:06 PM

यवतमाळ : घराबाहेर पडणाऱ्या आजीचा पदर धरुन, तिला “बाहेर जाऊ नकोस, कोरोना होईल” अशी विनवणी करणाऱ्या एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रडत रडत आर्त स्वरांनी विनवणी करणारी ही चिमुरडी आहे टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांची 3 वर्षांची कन्या सावी गावंडे. त्यामुळे लहान मुलांना समजलेलं वास्तव मोठ्या माणसांच्या पचनी कधी पडणार, असा प्रश्न आपसूक निर्माण होत आहे. (Yawatmal Small Girl requests Grandmother to Stay Home Stay Safe in Corona Trending Video Viral)

आजीचा पदर धरुन रडत समजवणाऱ्या यवतमाळच्या चिमुकल्या सावीचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर आला. प्रेक्षकांना हा व्हिडीओ भावला आणि अनेकांनी तो लगोलग शेअरही केला. या व्हिडीओला अनेक लाईक्सही मिळत आहेत. “बाहेर जाऊ नकोस, कोरोना होईल” अशी भीती चिमुकल्या सावीला वाटते, त्यामागे तिच्या मनात आहे आपल्या आजीची काळजी.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रकोप

एकीकडे कोरोनाचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. दिवसागणिक कोरोनामुळे मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने ” ब्रेक द चेन” अंतर्गत अनेक निर्बंध आणले आहे. पण नागरिक या निर्बंधांना जुमानतच नसल्याचं चित्र राज्यात सर्वत्र दिसत आहे.

अनेक भागांत रस्त्यावर बेलगाम गर्दी दिसून येत आहे. कित्येक जण तर मास्कही न घालता फिरत आहेत. स्वतःचा आणि पर्यायाने समाज आणि आपल्या कुटुंबीयांचाच जीव हे धोक्यात घालत आहेत. याच कारणांनी कोरोना वाढीचा स्फोट होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात बेड मिळणं दुरापास्त झालं आहे. सरकारने आणलेल्या निर्बंधांना जनतेने सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारणे जरुरी असताना त्याला हरताळ फासण्याचेच काम सुरु आहे .

चिमुकलीला समजलं, मोठ्यांना कधी समजणार?

अशातच एक चिमुकली आपल्या आजीचा पदर धरून बाहेर पडल्यास कोरोना होईल अशी आर्त विनवणी करत असल्याचा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावलेले आहेत. जर एवढ्याशा चिमुकलीला कळलं, तर आपल्याला का वळत नाही, असा प्रश्न समोर उभा राहतो आहे. जर कोरोनापासून वाचायचे असेल, तर या गोड चिमुकलीचा सल्ला जरुर माना असं तमाम नागरिकांना आवाहन आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO | पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे, पोलिसाच्या चिमुकल्याचा आकांत

(Yawatmal Small Girl requests Grandmother to Stay Home Stay Safe in Corona Trending Video Viral)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.