मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते; हर्षवर्धन पाटलांचा भरणेंना टोला
14 कोटी जनतेपैकी 40 ते 42 लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्याचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायचा असतो. | Harshvardhan patil
इंदापूर: मंत्रिपद हे फक्त नाचण्यासाठी नसते, लोकांची कामे करण्यासाठी असते, असा शब्दांत भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan patil ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्यावर निशाणा साधला. आम्ही बघतोय किती कामं होत आहेत. 14 कोटी जनतेपैकी 40 ते 42 लोकांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्याचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायचा असतो. दुर्दैवाने सध्याच्या सरकारमध्ये तशी लोकं दिसत नाहीत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली. (BJP leader Harshvardhan patil slams Dattatray Bharane)
ते रविवारी इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मंत्रिपद हे नाचण्यासाठी नव्हे तर काम करण्यासाठी असते, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी संजय राठोड यांच्याबाबतही भाष्य केले. सरकार चालवताना नैतिकता लागते. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील तथ्य ऑडिओ क्लीप्सच्या माध्यमातून बाहेर आले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. सार्वजनिक जीवनात काम करताना नैतिक मूल्य सांभाळून काम करावं लागतं. ते सध्या होताना दिसत नाही. अशी किती प्रकरणे झाल्यावर सरकारला जाग येईल, असा सवाल यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले होते दत्तात्रय भरणे?
मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांना तसेच सर्वसामान्य माणसांना किती होतो? हा खरा महत्त्वाचा विषय आहे. मी खोटं-नाट वैगरे अजिबात करणार नाही. जे काही करेल ते प्रामाणिकपणे तुम्हा सर्वसामान्यांसाठी करेन. तुम्ही सांगितलेली सगळी कामे मी करण्याचा प्रयत्न करेल. पण ती करताना ही सर्व कामे होतीलच असे सांगता येत नाही, कारण यात काही अडचणी असतात. काही मर्यादा असतात. काही कायद्यात बसवावी लागतात. जी कामे होणार नाहीत त्यात अडचणी असतील. त्याच मी नम्रपणे सांगेन, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले होते
संबंधित बातम्या:
‘ओ काका आमचा एक फोटो काढा की’…म्हणत विनंती, अन् मंत्री झाले फोटोग्राफर
मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही, त्याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हायला हवा : दत्तात्रय भरणे
(BJP leader Harshvardhan patil slams Dattatray Bharane)