असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
असंघटीत श्रेत्रात काम करणाऱ्यांसाठी सरकारकडून ई-श्रम कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या डाटा सरकार गोळा करणार आहे. सरकारकडून घोषित करण्यात येणाऱ्या सुविधांचा फायदा थेट कामगारांना मिळू शकणार आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात येत होते. पण महाराष्ट्रातील कामगारांची नोंदणी अजून सुरू आहे.
e shram card : सरकारच्या योजनांचा फायदा थेट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मिळण्यासाठी केंद्र सरकाकारकडून ई-श्रम कार्ड ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशात या क्षेत्रात काम करणार्या कामगारांची संख्या मोठी आहे. यात स्थलांतरीत होणाऱ्या कामगारांचा मोठा समावेश आहे. अशा कामगारांना केंद्र सरकारकडून काही सुविधा देण्यात येत आहे. तसेच भविष्यात देखील काही सेवा देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी अशा कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. मात्र 31 डिसेंबर 2021 ही ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात आले होते. पण ही तारीख फक्त उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी होती असे दिसत आहे. इतर राज्यातील कामगारांसाठी अशी कोणतीही तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.
ई-श्रम कार्डाचे फायदे
सरकार दरवर्षी अर्थसंकल्पात गरींबासाठी योजनांची घोषणा करत असते. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने ई-श्रम कार्डची घोषणा केली होती. हे कार्ड बनविण्याची प्रत्यक्षात सुरूवात 26 ऑगस्ट 2021 मध्ये झाली. यासाठी सरकारकडून व्यापक मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेची सुरूवात सरकारकडून करण्यात आली.या कार्डाच्या माध्यमातून कामगार सरकारी योजनांचा लाभ घेवू शकतात. या सध्या सुरू असणार्या आणि भविष्यातील योजनांचा यात समावेश असेल. पोर्टलवर नांदेणी केल्यानंतर बारा अंकाचा एक युनिक नंबर देण्यात येतो. नोंदणी केलेल्यांना दोन लाखाच्या अपघात विम्याची सोय सरकारकडून करण्यात येते.
ई-श्रम कार्ड नोंदणी सुरू
असंघटीत क्षेत्रात काम करणारे सर्व कामगार या ई-श्रम कार्ड योजनेत सहभागी होउ शकतात.सध्या ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करण्याची कुठलीही शेवटची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. नोंदणी केल्यानंतर 500 रुपयाचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021होती. पण ही अंतिम तिथी केवळ उत्तर प्रदेशातील कामगारांसाठी होती. जर तुम्ही असंघटीत क्षेत्रातील कामगार असाल आणि तुम्ही ई-श्रम कार्डासाठी नोंदणी केलेली नसेल तर हैरान होण्याची गरज नाही. कारण सरकारने अजून नोंदणी बंद केलेली नाही.
स्वत: करा नोंदणी
ई-श्रम कार्डाच्या नोंदणीसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. या केंद्र सरकारकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे ही योजना सुरू आहे. पहिला पर्याय स्वत: नोंदणी करण्याचा आहे. आधार कार्डद्वारे ही नोंदणी करता येणे शक्य आहे. जर स्वत: नोंदणी करता येत नसल्यास कॉमन सव्र्हिस सेंटरचा देखील पर्याय देण्यात आला आहे. या सेंटरवर जावून देखील नोंदणी करता येणे शक्य आहे. नोंदणी करणे अतिशय सोपे आहे. जर नोंदणी करतांना काही अडचण आल्यास हेल्प डेस्कची सुविधा देखील देण्यात येते. कामगार 14434 या टोल फ्रि क्रमांकावर फोन करून माहिती घेउ शकतात. टोल फ्रि क्रमांकाची सुविधा देशातील 9 भाषांमधून देण्यात येते.यामुळे देशातील कुठल्याही भागातील कामगार येथे फोन करून अडचणी दूर करू शकतो.
संबंधित बातम्या :
गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न
डिजिटल करन्सीसाठी चालू वर्ष कसे राहणार?; जाणून घ्या क्रिप्टोमधील गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञाचे मत