Gold Price Today: सोन-चांदी भावात 2 महिन्यातील मोठी घसरण, ‘त्या’ भावापेक्षा 9000 रुपयांनी खाली!

एमसीएक्स वर सोन्याचा भाव 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 47,343 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव 192 रुपयांच्या म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति किलोग्रॅम 60,415 वर पोहोचला. फेडरल रिझर्व्हने मार्चमध्ये व्याज दराच्या वाढीचे संकेत दिले होते. फेड रिझर्व्हच्या निर्णयामुळे डॉलर रुपयाच्या तुलनेत मजबूत झाला.

Gold Price Today: सोन-चांदी भावात 2 महिन्यातील मोठी घसरण, ‘त्या’ भावापेक्षा 9000 रुपयांनी खाली!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 10:10 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोने-चांदीच्या भावावर थेट परिणाम दिसून आला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात सोने-चांदीच्या भावात (Gold/Silver Price on 10 January 2022) घसरण नोंदविली गेली. आज (सोमवारी) मल्टि कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर फेब्रुवारी डिलिव्हरी सोन्याचे भाव 0.23 टक्के प्रति 10 ग्रॅम भावाने घसरले. तर, मार्च डिलिव्हरी चांदीच्या किंमतीत 0.32 टक्के घसरण नोंदविली गेली.

फेडरल रिझर्व्हच्या स्पष्टीकरणानंतर यूएस बाँड यील्डच्या तेजीच्या कारणामुळे मौल्यवान धातू डिसेंबर मध्ये उच्च स्तरावर 48, 700 रुपयांपर्यंत घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात, सोनाच्या भावात तेजीसह 1,795 डॉलर प्रति औंस झाला. मात्र, जानेवारी सर्वोच्च भाव स्तर 1,831 डॉलरच्या तुलनेत कमी होता. गेल्या महिन्यात अमेरीकेत रोजगार निर्मितीचा दर मंदावला होता. फेडरल रिझर्व्हने दर वाढीच्या दिलेल्या संकेतामुळे गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात तेजी निर्माण झाली.

सोने-चांदीचे ताजे भाव

एमसीएक्स वर सोन्याचा भाव 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 47,343 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव 192 रुपयांच्या म्हणजेच 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति किलोग्रॅम 60,415 वर पोहोचला. फेडरल रिझर्व्हने मार्चमध्ये व्याज दराच्या वाढीचे संकेत दिले होते. फेड रिझर्व्हच्या निर्णयामुळे डॉलर रुपयाच्या तुलनेत मजबूत झाला. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वोच्च भावाची पातळी गाठली होती. सोने प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांवर पोहोचले होते.

नव्या वर्षात स्वस्तात सोने खरेदी

सॉवरेन गोल्ड बाँड स्कीमचे सबस्क्रिप्शन आजपासून (सोमवार) ग्राहकांसाठी खुले झाले आहे. हे बाँडस सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बाँडसमध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने (Gold) ठेवण्याची जोखीम पत्कारण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बाँड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.

रिझर्व्ह बँकेने या सिरीजसाठी प्रतिग्रॅम इश्यू प्राईस 4,786 रुपये इतकी निश्चित केली आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रतिग्रॅम सोन्यापाठी 50 रुपयांची सूट मिळेल. सध्या सोने-चांदीचा दर हा सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे.

वेळोवेळी योजनेत गुंतवणुकीची संधी

सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बाँडच्या सीरिज जारी करते. याअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळते. तसेच त्यामध्ये सरकारकडून सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते. हा बाँड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना केवायसीचे निकष बाजारपेठेतून सोने खरेदी करण्याप्रमाणेच असतील. सरकारची सॉवरेन गोल्ड बाँड ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झाली.

इतर बातम्या –

EPFO खातेधारकांसाठी खूशखबर! इमर्जन्सीमध्ये काढा 1 लाख/- दिवसाची प्रक्रिया 60 मिनिटांत

आधार कार्डची सद्यस्थिती जाणून घ्यायची आहे? असे तपासा Status ऑनलाईन

सेन्सेक्सला ‘तेजी’चा डोस: 651 अंकांची वाढ, गुंतवणूकदार 2.33 लाख कोटींनी मालामाल!

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.