साखरेचं अर्थचक्र: उत्तरप्रदेशात घट, महाराष्ट्रात वाढ; देशात 115 लाख टन साखर उत्पादन
देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य उत्तरप्रदेशच्या साखर उत्पादनात घट नोंदविली गेली आहे. 30.90 लाख टन साखर उत्पादन नोंदविले गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन लाख टनांनी उत्पादन कमी आहे. महाराष्ट्रात साखरेच्या उत्पादनात मात्र वाढ झाली आहे.
नवी दिल्ली: देशातील साखरेच्या उत्पादनात ऑक्टोबर-डिसेंबर सत्रात 4.75 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. साखर उत्पादनाने 115.70 लाख टनांचा टप्पा गाठला आहे. परंतु दुसरीकडे सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या असलेल्या उत्तर प्रदेशात साखर उत्पादनात घटले आहे. महाराष्ट्रात पाच टक्क्यांनी साखर उत्पादनात वाढ नोंदविली गेली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने (NFCSFL) याविषयीची आकडेवारी प्रकाशित केली आहे.
महाराष्ट्र अप, उत्तर प्रदेश डाउन
देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य उत्तरप्रदेशच्या साखर उत्पादनात घट नोंदविली गेली आहे. 30.90 लाख टन साखर उत्पादन नोंदविले गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन लाख टनांनी उत्पादन कमी आहे. महाराष्ट्रात साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच लाख टनांनी उत्पादनात वाढ होऊन 45.75 लाख टनांवर उत्पादन पोहोचले आहे. कर्नाटकात साखर उत्पादनात 24.15 लाख टन उत्पादन नोंदणीसह किंचित वाढ दिसून येत आहे.
राज्यनिहाय उत्पादन आकडेवारी:
ऑक्टोबर-डिसेंबर सत्रात गुजरातचे साखर उत्पादन 3.35 लाखांहून 3.40 लाख टनांवर पोहोचले आहे. साखर महासंघाच्या आकडेवारीनुसार, मध्यप्रदेश, पंजाब, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्ये साखर उत्पादनात किचिंतशी वाढ नोंदविली गेली आहे. वर्ष 2021-22 मध्ये साखरेचे उत्पादन 315 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. 2020-21 मध्ये उत्पादन 311.05 लाख टन होते.
साखरेच्या भाववाढीची प्रतीक्षा
भारतीय साखरकारखाने साखरेच्या भाव वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. जागतिक बाजारात कच्चा साखरेच्या भावातील घसरणीमुळे निर्यात थंडावली आहे.
निर्यातीची आकडेवारी
वर्तमान सत्रासाठी अद्याप नऊ महिने बाकी आहे. त्यामुळे साखर कारखाने भविष्यातील निर्यातीसाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहेत. चालू सत्रात ऑक्टोबर-नोव्हेंबर कालावधीदरम्यान 6.5 लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण तीन लाख टनांहून अधिक होते.
47.50 लाख टन साखर विक्री
साखर महासंघाच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारपेठेत ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान 47.50 लाख साखरेची विक्री करण्यात आली. या कालावधीसाठी केंद्र सरकारने 46.50 लाख विक्री कोटा निश्चित केला होता. मापन दोन महिन्यांच्या कालावधीत साखरेचे उत्पादन 115.55 लाख टनांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी साखर उत्पादन 110.74 लाख टन होते. ऊस उत्पादक राज्यात सध्या ऊस लागवड अभियानाला गती देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड, नोंदणीची शेवटची तारीख काय, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं
Public Provident Fund: गुंतवणूक मंत्र: पीपीएफ सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह, वार्षिक 7.1% रिटर्न
आता ग्राहकच राजा, उत्पादनातील दोषाची बिनधास्त करा तक्रार , खटल्यांचा निकाल ही लागणार झटपट