Gold Price| आली लगीन सराई, करा स्वस्तातले सोने खरेदीची घाई, जाणून घ्या राज्यातले दर…!

सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात पाचशे ते सहाशे रुपयांची पडझड पाहायला मिळाली. या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाज आहे.

Gold Price| आली लगीन सराई, करा स्वस्तातले सोने खरेदीची घाई, जाणून घ्या राज्यातले दर...!
सोन्या-चांदीचे भावImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 11:29 AM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48360 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 45860 रुपये नोंदवले गेले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण नोंदवली गेली. या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळायची शक्यता, दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी टीव्ही 9 मराठी बोलताना व्यक्त केली.

असे नोंदवले नाशिकचे भाव

नवसे म्हणाले की, सराफा बाजाराचे शनिवारी आणि रविवारी दर जाहीर होत नसतात. त्यामुळे या दोन्ही दिवसाचे दर स्थिर होते. त्यामुळे सोमवारी सकाळी नाशिकच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48360 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 45860 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलो मागे 60700 रुपये नोंदवले गेले. आता आज दुपारी बारानंतर सोमवारचे सोन्याचे दर जाहीर होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुंबई, पुणे, नागपुरातही सुकाळ

मुंबईच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48560 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46620 रुपये नोंदवले गेले. पुण्याच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48,560 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45860 रुपये नोंदवले गेले. नागपूरच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48620 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 46620 रुपये नोंदवले गेले.

औरंगाबादलाही पडझड

औरंगाबादच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम मागे 48,560 रुपये नोंदवले गेले. सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात पाचशे ते सहाशे रुपयांची पडझड पाहायला मिळाली. या आठवड्यातही सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाज आहे. कोरोना साथीच्या या दरावर कसलाही परिणाम होणार नाही. कारण कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तर गंभीर होण्याचा धोका कमी आहे. त्यामुळे ग्राहकी चांगली राहिली आहे. बाजारात उलाढालाही चांगली होत आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

24 कॅरेट सोन्याचे दर – मुंबई – 48560 – पुणे – 48,560 – नाशिक – 48360 – नागपूर – 48620 – औरंगाबाद – 48620

इतर बातम्याः

Nashik new corona restrictions| आजपासून नवे निर्बंध; 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत

Nashik|कोरोनाचे बळी 4 हजार अन् अनुदानासाठी अर्ज आले 8 हजार; मग मृतांची आकडेवारी खोटी की, अर्जदार बोगस?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.