AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माओवाद खेड्यात रुजलाय, शहराशी संबंध नाही, पोलिसांनी अपमानित केलं: आनंद तेलतुंबडे

मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून केलेल्या अटकेनंतर विचारवंत, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आज आपली भूमिका सविस्तर मांडली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार किंवा एल्गार परिषदेत आपला काही संबंध नसल्याचं ते म्हणाले. भीमा कोरेगाव प्रकरणात विचारवंत डॉ आनंद तेलतुंबडे यांना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी कोर्टाने त्यांना […]

माओवाद खेड्यात रुजलाय, शहराशी संबंध नाही, पोलिसांनी अपमानित केलं: आनंद तेलतुंबडे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणी पोलिसांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून केलेल्या अटकेनंतर विचारवंत, प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आज आपली भूमिका सविस्तर मांडली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार किंवा एल्गार परिषदेत आपला काही संबंध नसल्याचं ते म्हणाले. भीमा कोरेगाव प्रकरणात विचारवंत डॉ आनंद तेलतुंबडे यांना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी कोर्टाने त्यांना सोडून दिलं.

एका बाजूला नक्षल समर्थक असल्याचा आरोप तर दुसऱ्या बाजूला कोर्ट कचेरी सुरु आहे. याबाबत आनंद तेलंतुबडे म्हणाले, “पोलिसांचा आरोप आहे की दलितांना भडकवण्यासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. एल्गार परिषद ही न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आणि न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी आयोजित केली होती. ते त्याबाबत ओरडून ओरडून सांगत आहेत. एल्गार परिषदेविरोधात लिहलं होतं. त्यामुळे माझ्याविरोधात दलितात प्रचंड रोष होता. मला एल्गार परिषदेत काय झालं किंवा भीमा कोरेगावला काय झालं हे मला कळालं पण नाही”.  वाचा: भीमा कोरेगाव : डॉ. आनंद तेलतुंबडेंना सोडण्याचे पुणे कोर्टाचे आदेश

इतकंच नाही तर जगातील सर्वच उत्तम युनिव्हर्सिटीत मी लेक्चरला जातो. 29 ऑगस्ट रोजी माझ्या घरी झडती झाल्यानंतर हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी निदर्शन केली. खडकपूर आयआयटीमध्ये निदर्शने झाली, अमेरिकेतील प्रत्येक शहरात निदर्शन झाली, असं तेलतुंबडेंनी सांगितलं.

टू कॉम्रेड आनंद असं एक पत्र वाचून दाखवलं, त्यावरुन माझा संबंध लावला, असं तेलतुंबडे म्हणाले.

मी शाळेपासून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. लोकांच्या हितासाठी लिहिलं. भारत पेट्रोमध्ये कार्यकारी संचालक होतो. 2010 पर्यंत सीईओ म्हणून नोकरी केली. खडकपूरच्या सर्वात मोठ्या आयआयटीने मला बोलावलं, तिथं कोर्स सुरू केला. हा माझा प्रवास आहे. मी जे शिक्षण घेतलंय, एवढं शिक्षण घेणारा एकही माणूस मिळणार नाही. अशा माणसाला पोलीस क्रिमिनल अर्थात गुन्हेगार करु पाहत आहेत. मला पोलिसांनी ताब्यात घेतलं, चला म्हणाले. जन्मात कधी विसरू शकत नाही, असं माझ्यासोबत घडलं. कोठडीत कोंबलं, खूप अपमानित झालो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

माझा इथल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. संविधानावर विश्वास आहे, असं त्यांनी नमूद केलं.

माजी एक मिटिंग पॅरिसमध्ये होती. त्यासाठी माओवाद्यांनी फायनान्स केला असा आरोप आहे. मी डायरेक्टर असताना महिन्यातले 15 दिवस बाहेर असायचो. माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई होते. पण कोण कारवाई करत आहे सांगता येत नाही. माओवाद हा खेडयात रुजला आहे. त्याचा शहराशी काही संबंध नाही. आता या वातावरणात कार्यकर्त्यांनी काय करायला हवं हाच प्रश्न आहे, असंही तेलतुंबडे म्हणाले.

कोण आहेत आनंद तेलतुंबडे?

पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवादाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेलतुंबडे सध्या गोव्यातील एका संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला तेलतुंबडे यांच्या पुणे येथील घरावर छापा मारला होता. मात्र या छाप्यात काहीही हाती लागलं नाही. हा छापा नसून औपचारिक भेट असल्याचं यावर बोलताना सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. वाचा – एल्गार परिषद : कवी वरावर राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी

तूर्तास तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज नसली, तरी गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळण्यास सरकारी वकिलांकडून जोरदार विरोध करण्यात आला. कॉ. प्रकाश यांच्याकडे सापडलेली पत्र आणि रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधील डेटाच्या आधारावर तेलतुंबडे आणि इतर सर्वांविरुद्ध सबळ पुरावे असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात यापूर्वी सांगितलं होतं. वाचा – एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला : पुणे पोलीस

आनंद तेलतुंबडे यांचे बंधू मिलिंद तेलतुंडबे यांना ‘कॉम्रेड एम’ या नावाने संबोधलं जात असल्याचाही दावा करण्यात आलाय. मिलिंद तेलतुंबडे हे या प्रकरणात वॉन्टेड आहेत. मात्र आनंद तेलतुंबडे यांचा त्यांच्या भावाशी गेली 26 वर्षे कोणताही संपर्क नसल्याचा दावा करण्यात येतोय. 6 डिसेंबर रोजी पुणे पोलिसांनी पाच संशयितांच्या विरोधात जे दोषारोपपत्र दाखल केलंय, त्यात मिलिंद तेलतुंबडे यांचंही नाव आहे.

संबंधित बातम्या 

भीमा कोरेगाव : डॉ. आनंद तेलतुंबडेंना सोडण्याचे पुणे कोर्टाचे आदेश

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टातही दिलासा नाहीच  

 एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला : पुणे पोलीस

  एल्गार परिषद : कवी वरावर राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी 

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंसाठी बी. जी. कोळसे पाटील मैदानात 

 एल्गार परिषद प्रकरणी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.