पनवेल मनपा आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्तांचीही बदली

पनवेल मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पनवेल मनपा आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्तांचीही बदली
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 12:25 AM

पनवेल : ऐन कोरोनाच्या संकटात राज्य शासनाने (Additional Commissioner of Panvel Corporation Transfer) पनवेल मनपाचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची ठाणे महानगरपालिकेत बदली केली. नवीन आयुक्त सुधाकर देशमुख हे स्थिरस्थावर होत असतानाच नगर विकास विभागाने आणखी एक निर्णय घेतला आहे. पनवेल मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ (Dr. Prashant Rasal) यांचीही बदली करण्यात आली आहे. डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना विरोधात लढा देण्यासाठी पनवेल महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत (Additional Commissioner of Panvel Corporation Transfer).

2016 साली पनवेल महानगरपालिका ची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत मनपाला अधिकाऱ्यांचा वाणवा आहे. तत्कालीन उपायुक्त संध्या बावनकुळे यांच्या बदलीनंतर त्याच पदावर दुसरा अधिकारी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यानंतर पनवेल महानगरपालिका डॉ. प्रशांत रसाळ यांच्या रुपाने अतिरिक्त आयुक्त मिळाले. त्यांनी गेल्या वर्ष दीड वर्षात अतिशय चांगले काम केले. घनकचरा व्यवस्थापनाची घडी त्यांनी बसवली. प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेत त्यांनी काम केले. शांत संयमी आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

पनवेलमध्ये कोरोना संकटात त्यांनी गेली तीन महिने समाधानकारक काम केलं. त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या सांभाळल्या. त्यांच्या अनुभवाचा या वैश्विक संकटात पनवेल मनपाला काम करताना फायदा झाला (Additional Commissioner of Panvel Corporation Transfer).

दरम्यान, पनवेलमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशावेळी राज्य सरकारने डॉ. प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून बदली केली आहे. अंबरनाथ येथे कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने रसाळ यांची त्या ठिकाणी बदली केली आहे. पनवेलचा पूर्ण अभ्यास असलेल्या या अधिकाऱ्याच्या बदलीने काहीशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तृप्ती सांडभोर नव्या अतिरिक्त आयुक्त

पनवेल महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांडभोर या नगरपरिषद प्रशासन संचालनालय कोकण भवन येथे प्रादेशिक उपसंचालक म्हणून काम पाहत होत्या.

Additional Commissioner of Panvel Corporation Transfer

संबंधित बातम्या :

IAS Transfer | ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली, डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त

IAS Transfer | राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.