अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता कोरोना पॉझिटिव्ह

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोना संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे.(After Ajit Pawar NCP MP Sunil Tatkare tested corona positive admitted at hospital in Mumbai)

अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 12:03 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोना संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तटकरे यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. (After Ajit Pawar NCP MP Sunil Tatkare tested corona positive admitted at hospital in Mumbai)

सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरे मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून लवकर बरं होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे, असं तटकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेले होते. तो दौरा अर्धवट सोडून ते माघारी परतले होते. त्यानंतर अजित पवार त्यांच्या घरीच विलगीकरणात होते. अजित पवार यांची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. सोमवारी अजित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणीसाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले होते. त्यानंतर ते मुंबईतील सरकारी रुग्णालय सेंट जॉर्जमध्ये उपचार घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिली प्लाझ्मा थेरेपी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

दादा लढवय्ये, लवकर बरे व्हा, सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना सदिच्छा

काळजी करु नका, अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील: अमोल मिटकरी

(Sunil Tatkare tested corona positive admitted at hospital in Mumbai)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.