भीमा कोरेगाव : डॉ. आनंद तेलतुंबडेंना सोडण्याचे पुणे कोर्टाचे आदेश

मुंबई/पुणे: शहरी नक्षली संबंधांच्या आरोपांवरुन प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. पुणे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. पण तेलतुंबडे यांना 11 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून सुप्रीम कोर्टाने अंतरिम संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात यावं, असे आदेश पुणे कोर्टाने दिले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात तेलतुंबडेंना हजर करण्यात आलं […]

भीमा कोरेगाव : डॉ. आनंद तेलतुंबडेंना सोडण्याचे पुणे कोर्टाचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई/पुणे: शहरी नक्षली संबंधांच्या आरोपांवरुन प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. पुणे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. पण तेलतुंबडे यांना 11 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून सुप्रीम कोर्टाने अंतरिम संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात यावं, असे आदेश पुणे कोर्टाने दिले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात तेलतुंबडेंना हजर करण्यात आलं होतं.

सुप्रीम कोर्टाने तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत, खालच्या कोर्टात जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर काल पुणे कोर्टानेही जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर आज पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पहाटे तीनच्या सुमारास मुंबईत अटक केली. त्यानंतर मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करण्यात आली.  आनंद तेलतुंबडे यांच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप आहे. पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं होतं.

21 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांचा एफआयआर रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. शिवाय अटकेपासून तीन आठवड्यांसाठी संरक्षण दिलं होतं. यानंतर आनंद तेलतुंबडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही.

वाचा:  एल्गार परिषद प्रकरणी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

पुणे शहरात शनिवारवाडा प्रांगणात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली. या परिषदेसाठी चार ते पाच महिने सुरु असलेली पूर्वतयारी आणि परिषदेत झालेली भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव भिमा येथे एक जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला. त्या हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

कोण आहेत आनंद तेलतुंबडे?

पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवादाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेलतुंबडे सध्या गोव्यातील एका संस्थेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पुणे पोलिसांनी 28 ऑगस्टला तेलतुंबडे यांच्या पुणे येथील घरावर छापा मारला होता. मात्र या छाप्यात काहीही हाती लागलं नाही. हा छापा नसून औपचारिक भेट असल्याचं यावर बोलताना सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. वाचा – एल्गार परिषद : कवी वरावर राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी

तूर्तास तेलतुंबडे यांना अटक करण्याची गरज नसली, तरी गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळण्यास सरकारी वकिलांकडून जोरदार विरोध करण्यात आला. कॉ. प्रकाश यांच्याकडे सापडलेली पत्र आणि रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमधील डेटाच्या आधारावर तेलतुंबडे आणि इतर सर्वांविरुद्ध सबळ पुरावे असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात यापूर्वी सांगितलं होतं. वाचा – एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला : पुणे पोलीस

आनंद तेलतुंबडे यांचे बंधू मिलिंद तेलतुंडबे यांना ‘कॉम्रेड एम’ या नावाने संबोधलं जात असल्याचाही दावा करण्यात आलाय. मिलिंद तेलतुंबडे हे या प्रकरणात वॉन्टेड आहेत. मात्र आनंद तेलतुंबडे यांचा त्यांच्या भावाशी गेली 26 वर्षे कोणताही संपर्क नसल्याचा दावा करण्यात येतोय. 6 डिसेंबर रोजी पुणे पोलिसांनी पाच संशयितांच्या विरोधात जे दोषारोपपत्र दाखल केलंय, त्यात मिलिंद तेलतुंबडे यांचंही नाव आहे.

संबंधित बातम्या 

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टातही दिलासा नाहीच  

 एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला : पुणे पोलीस

  एल्गार परिषद : कवी वरावर राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी 

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंसाठी बी. जी. कोळसे पाटील मैदानात 

 एल्गार परिषद प्रकरणी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.