Arnab Goswami Case LIVE | हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्ट म्हणाले…..

अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे.

Arnab Goswami Case LIVE | हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्ट म्हणाले.....
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 5:20 PM

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामीला अलिबाग न्यायालयाने 14 दिवसाची (Arnab Goswami Live Updates) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अर्णव गोस्वामींनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे अलिबाग पोलिसांनी अर्णव गोस्वामींना पोलीस कोठडी मिळावी म्हणून सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टात याचिका दाखल केल्याने सेशन कोर्टातील जामीन अर्ज मागे घ्यावा लागला.   (Arnab Goswami Live Updates).

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाने आजच्या आज जामीन देण्यास नकार दिल्याने, अर्णव गोस्वामी यांना आजची रात्र अलिबागच्या शाळेत काढावी लागणार आहे. कोरोनामुळे क्वारटांईन सेंटरला जेलमध्ये रुपांतरित केलं आहे. दरम्यान, अर्णव यांच्या जामिनावर शुक्रवारी दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टात मोठी जुगलबंदी रंगली. महत्त्वाचं म्हणजे देशातील ख्यातनाम वकील हरीश साळवे यांनी अर्णव यांची बाजू मांडली. अर्णव यांच्या जामीनाबाबत युक्तीवाद करताना हरीश साळवे कोर्टाला म्हणाले, “हा नागरिकांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. अर्णव पत्रकार आहेत. त्यांना आज जामीन दिला तर स्वर्ग कोसळणार नाही”. यावर कोर्टाने आम्हाला केवळ तुमचंच म्हणणं ऐकून जामिनाचा निर्णय घेता येणार नाही, दोन्ही बाजू ऐकाव्या लागतील. त्याबाबत उद्या पुन्हा सुनावणी करु” असं नमूद केलं.

LIVE 

[svt-event title=”अर्णव गोस्वामींच्या याचिकेवर उद्या सुनावणी” date=”05/11/2020,4:32PM” class=”svt-cd-green” ] अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामींना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, उद्या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार [/svt-event]

[svt-event title=”अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच” date=”05/11/2020,4:25PM” class=”svt-cd-green” ] अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच, जामीन अर्जावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी [/svt-event]

[svt-event title=”अर्णव गोस्वामींकडून हरिश साळवेंचा युक्तीवाद” date=”05/11/2020,4:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अर्णव गोस्वामींसह तिन्ही संशयित आरोपींची नगरपालिकेच्या शाळेत रवानगी” date=”05/11/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ] अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सरडा या  तिन्ही संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडी अलिबाग नगरपालिकेच्या शाळेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही आरोपींना अलिबाग जेलमध्ये न नेता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे अर्णवला क्वारटांईन सेंटर शाळेमध्ये ठेवण्यात आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुख्य न्यायाधीशांनी जामीन फेटाळल्यास तात्काळ उच्च न्यायालयात अर्ज करणार” date=”05/11/2020,11:28AM” class=”svt-cd-green” ] अलिबाग मुख्य न्यायदडांधिकारी यांच्या कोर्टात काल अर्णव गोस्वामींच्या जामीन करता केला अर्ज, मुख्य न्यायाधीशांनी जामीन फेटाळल्यास तात्काळ उच्च न्यायालयात जामिनाकरीता अर्ज करण्याच्या अर्णव गोस्वामींच्या वकिलांनी तयारी, सूत्रांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”गोस्वामीच्या कॅम्पमधून उच्च न्यायालयात जामिनासाठी हालचालीनां वेग” date=”05/11/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ] न्यायालयीन कस्टडीतील अर्णव गोस्वामींच्या कॅम्पमधून उच्च न्यायालयात जामीन मागण्याच्या हालचालीनां वेग [/svt-event]

अन्वय नाईक प्रकरणात न्यायालयात नक्की काय झालं?

अलिबाग पोलिसांनी सकाळच्या सत्रात साडे 12 वाजता अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयात हजर केलं.

अर्णव गोस्वामीच्या वकिलांचा युक्तिवाद

आमच्या आशीलाला कोणतीही पूर्वसूचना न देता घरात घुसून अटक केलेली आहे. हे सगळं करताना त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. त्यामध्ये त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या. त्यामुळे पोलिसविरोधात तक्रार दाखल केली

न्यायाधीशांचे आदेश

आरोपीची वैद्यकीय तपासणी करुन अहवालासाहित दुपारनंतरच्या सत्रात पुन्हा कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिली. संध्याकाळनंतरच्या सत्रात 5 वाजता अर्णव गोस्वामी आणि त्यानंतर इतर दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.

न्यायाधीशांनी मारहाणीची तक्रार फेटाळली

आरोपीचा वैद्यकीय तपासणी अहवाल पाहिल्यानंतर तसेच वैद्यकीय अधिक्षकांचे मत जाणून घेतल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्याचे स्पष्ट होत नसल्याने तक्रार फेटाळली.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी केलेल्या आत्महत्येस या प्रकरणातील तीनही आरोपी जबाबदार आहेत. याबाबतचा रीतसर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा योग्य तपास झाला नाही. म्हणून केस रीओपन होऊन नव्याने तपास सुरु केला. त्यामध्ये प्राथमिक चौकशीत सकृतदर्शनी पुरावे संबंधित आरोपींच्या विरोधात पोलिसाकडे आहेत. त्यामुळे अधिक तपासासाठी आणि चौकशीसाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

अर्णव गोस्वामींच्या वकिलांचा युक्तीवाद

मे 2018 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात 2 वर्षात तपासादरम्यान पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे या आरोपीवर कारवाई न करता उलट याच पोलिसांनी माननीय न्यायालयात प्रकरण बंद करण्याचा (क्लोजर रिपोर्ट) देऊन हे प्रकरण संपुष्टात आणले होते. त्यामुळे यामध्ये नव्याने कोणतेही पुरावे पोलिसांकडे नाहीत. केवळ आकसापोटी सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याने तसेच आरोपींकडून कोणतीही रिकव्हरी नसल्याने पोलीस कोठडीची गरज नाही (Alibaug Court Sent Arnab Goswami To Judiacial Custody).

न्यायाधीशांनी काय निर्णय दिला?

दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पोलीस कोठडीसाठी आवश्यक असणारे मुद्दे तसेच पुरावे पोलिसांनी यावेळी न्यायालयासमोर सादर केलेले दिसत नाहीत. त्याचसोबत क्लोजर रिपोर्टनंतर यावर सुनावणी किंवा फेरतपासणीची कोणतीही कारवाई झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नाही. यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता वाटत नाही, असं न्यायाधीशांनी सांगितलं. या सगळ्या सुनावणीनंतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Arnab Goswami Live Updates

संबंधित बातम्या :

अर्णव गोस्वामीच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीसाठी अलिबाग पोलिसांची सेशन कोर्टात धाव

Arnab Goswami | अर्णव गोस्वामी प्रकरण : न्यायालयात नेमकं काय घडलं?

अर्णवच्या पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.