आतापर्यंत बॉलीवूड वाचवण्यात मग्न असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उशीराने का होईना पण शहाणपण सुचलं- शेलार

राज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित आहे.| Ashish Shelar

आतापर्यंत बॉलीवूड वाचवण्यात मग्न असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उशीराने का होईना पण शहाणपण सुचलं- शेलार
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 1:02 PM

मुंबई: आतापर्यंत बॉलीवूडला वाचवण्याचं काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखेर घराबाहेर पडण्याचे शहाणपण सुचल्याची खोचक टिप्पणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्री बांधावर गेल्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी फायद होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा म्हणजे ‘देर आये, दुरुस्त आये’ अशाप्रकारचा असल्याचे शेलार यांनी सांगितले. (Ashish Shelar criticised CM Uddhav Thackeray )

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विश्वासघाताने तयार झालेले हे सरकार आत्मविश्वास विरहीत आहे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आत्मसन्मानाची भावना असणे सोईचे नाही. तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत द्यावी की केंद्राने हा मुद्दा महत्त्वाचा नाही. कुठूनही मदत मिळो, पण शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अपेक्षित असल्याचे शेलार यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलेल्या नाराजीविषयी आशिष शेलार यांना विचारणा करण्यात आली. परंतु, अमित शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांनी टिप्पणी करणे योग्य नसल्याचे सांगत शेलार यांनी या मुद्द्यावर बोलणे टाळले.

‘सामनाचे अग्रलेख व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीमधून माहिती घेऊन लिहले जातात’ महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांच्या संपादकांचे लेख हे अभ्यासावर आधारित असतात. मात्र, ‘सामना’चे लेख व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीमधून घेतलेल्या माहितीच्याआधारे लिहले जातात. बांगलादेशचा जीडीपी भारताच्या 11 टक्के आहे. ‘सामना’कडून त्या देशाची तुलना भारताशी केली जाते. हे अयोग्य आहे. रावसाहेब दानवे यांनी हे सरकार येरागबाळ्याचे असल्याचे म्हटले होते. पण हे सरकार केवळ येरागबाळ्याचे नव्हे तर बदमाशांचेही आहे, असे शेलार यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

देश येड्यागबाळ्यांच्या हाती, असे दानवेंना म्हणायचं का? शिवसेनेचा सवाल

आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?; निलेश राणेंचा खोचक सवाल

शेतकऱ्यांना मदतीचं स्वत: मोदींनी आश्वासन दिलंय, प्राथमिक जबाबदारी राज्याची, तुम्ही काय करणार हे सांगा : फडणवीस

राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले

(Ashish Shelar criticised CM Uddhav Thackeray )

दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.