ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी, ते पालिकेच्या मिशनवर : आशिष शेलार

'राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60, तर दुसरे म्हणतात 50 जिंकू... आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले'

ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी, ते पालिकेच्या मिशनवर : आशिष शेलार
Follow us
| Updated on: Mar 01, 2020 | 8:00 PM

मुंबई : ‘मुंबईत केवळ 8 नगरसेवक आहेत. यापुढे 50 ते 60 जागांवर (Ashish Shelar Tweet On Ajit Pawar) विजय मिळाला पाहिजे’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ‘मिशन मुंबई’ कार्यक्रमादरम्यान केलं. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यातून टोला लगावला. ‘राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60, तर दुसरे म्हणतात 50 जिंकू… आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले’, असं ट्विट करत आशिष शेलारांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

“राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात (Ashish Shelar Tweet On Ajit Pawar) 50 जिंकू…आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!”, असं ट्विट आशिष शेलार यांनी केला.

अजित पवार काय म्हणाले?

“शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेलासोबत घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शिवसेना मुंबई महापालिकामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे. त्यांनी 1 नंबरवरच राहावं पण राष्ट्रवादी 2 नंबरवर असायलाच हवी”, असं अजित पवार कार्यककर्त्यांना उद्देशून म्हणाले होते.

“मुंबईत 36 पैकी 10 आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत. मुंबईत केवळ 8 नगरसेवक आहेत. यापुढे 50 ते 60 जागांवर विजय मिळाला पाहिजे. काम करताना तुमच्याजवळ असलेल्या पदाचा उपयोग समाजोपयोगी कामांसाठी करा. पक्षाची बदनामी आणि पवार साहेबांची बदनामी होऊ देऊ नका”, अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.

राष्ट्रवादीचं ‘मिशन मुंबई 2022’

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप आणि इतर पक्षांत प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खेद व्यक्त केला (Deputy Chief Minister Ajit Pawar). आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज मुंबईत ‘मिशन मुंबई 2022’ या शिबिरचे आयोजन (Ashish Shelar Tweet On Ajit Pawar) केलं होतं. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक सूचना दिल्या.

हेही वाचा : ‘त्यांना’ सगळं दिलं मात्र एकही मायचा लाल थांबला नाही : अजित पवार

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.