‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा’
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
मुंबई: मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकून काढावा, अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली. मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसेल, हा समज चुकीचा आहे. माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, असे हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. (Haribahu Rahtod on Maratha Reservations)
ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा. वटहुकूम काढल्यानंतर संसदेत घटनादुरूस्ती करावी लागेल. यासाठी मी छत्रपती संभाजीराजे यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजेhttps://t.co/hzwIP7SX0l#SambhajirajeChhatrapati #MarathaReservation@YuvrajSambhaji
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2020
गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला हरिभाऊ राठोड आणि मुस्लिम ओबीसी संघाचे अध्यक्ष युसूफ मणियार हेदेखील उपस्थित होते. छत्रपती संभाजीराजे या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे आता या बैठकीअंती मराठा समाजाचे नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीराजेंची राज्य सरकारवर टीका
मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी आज नवी मुंबईत मराठा नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चालढकल करत आहे. मराठा समाजाला सरकारने फसवलं. राज्य सरकार त्यांच्या हातात असलेल्या गोष्टीही करत नाही. सारथी संस्था सुद्धा तुम्ही बुडीत घातली, अण्णासाहेब पाटील महामंडळाला काय दिलं?, फक्त राज्य सरकारने खेळखंडोबा केला, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.
संबंधित बातम्या:
माझी खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको- संभाजीराजे
मोठी बातमी! मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजेंची दांडी; संभाजीराजेंची हजेरी!
(Haribahu Rahtod on Maratha Reservations)