1 लाख झाडं पडली, 500 मोबाईल टॉवर कोसळले, रायगडमध्ये विध्वंस, 2 दिवसात पंचनाम्याचे आदेश

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.

1 लाख झाडं पडली, 500 मोबाईल टॉवर कोसळले, रायगडमध्ये विध्वंस, 2 दिवसात पंचनाम्याचे आदेश
Follow us
| Updated on: Jun 04, 2020 | 7:46 PM

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे (Damage Caused By Cyclone Nisarga) दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीज पुरवठा सुरु करावा आणि प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ , साधन सामुग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आज निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा (Damage Caused By Cyclone Nisarga) आढावा घेतला.

रायगड जिल्ह्यात घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचविणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या. संकट मोठे आहे, आपण सर्व कोरोनामध्ये दिवस रात्र काम करीत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय, मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडतांना त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

“आपल्या नशिबामुळे या चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. महत्वाचा मुद्दा असा की, पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत. पण, आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, “खऱ्या अर्थाने सतर्कता काय असते ती पहायला मिळाली. विद्युत तारा, खांब पडणे यामुळे पुनर्वसन अवघड होते. हे प्राधान्याने लवकरात लवकर उभे करणे गरजेचे आहे. मदत जितकी लवकर पोहचेल तितके लोकांना दिलासा मिळेल”.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “ठाणे जिल्ह्याला सुदैवाने धोका पोहोचला नाही. पंचनामे सुरु करण्यात आले आहेत”. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, “ठाण्याला विशेष फटका बसला नाही. 162 कच्च्या घरांची पडझड झाली, झाडांच्या फांद्या पडल्याच्या 360 घटना घडल्या. जिल्ह्यातील सर्व मार्ग आणि महामार्ग सुरु झाले आहेत. उल्हासनगर येथे काही वेळेसाठी दूरध्वनी सेवा खंडित झाली होती” (Damage Caused By Cyclone Nisarga).

रायगडमध्ये लाखो घरांचे नुकसान, 1 लाख झाडं पडली

रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. 1 लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. श्रीवर्धन आणि मुरुडच्यामध्ये चक्रीवादळ धडकले, त्याचा फटका श्रीवर्धनला जास्त बसला असून सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत. जिल्ह्यात 5 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत. मात्र, अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही पाठवणे शक्य झालेले नाही. दूरध्वनी आणि मोबाईल सेवा खंडित झाल्याने नागरिक घाबरले आहेत, त्यांना इतरांशी संपर्क शक्य होत नाही. टेलिकॉम यंत्रणा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वीज नसल्याने 500 मोबाईल टॉवर पडले आहेत. १० बोटी अंशत: नुकसान झाले असून 12 हेक्टर मत्स्यशेती खराब झाली आहे, अशी माहिती रायगड निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली.

दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. 3 हजार झाडे पडली आहेत. 14 सबस्टेशन, 1962 ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब पडले आहेत. पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

पालघर, अहमदनगर, नाशिकमध्येही मोठं नुकसान

मुंबई शहरात 25 ठिकाणी झाडे पडली. तर मुंबई उपनगरांमध्ये 55 ठिकाणी झाडे पडली. तसेच, 2 घरांची पडझड झाली. विभागीय आयुक्त कोकण यांनी देखील वीज पुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

प्रारंभी प्रधान सचिव मदत आणि पुनर्वसन किशोर राजे निंबाळकर यांनी चक्रीवादळाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, या वादळामुळे राज्यात 72.5 मिमी पाऊस झाला. सर्वात जास्त पाऊस 152 मिमी जालना येथे झाला. राज्यात 78 हजार 191 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तर 21 एनडीआरएफ आणि 6 एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली होती.

6 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 6 जनावरं दगावली आहेत. तर 16 नागरिक जखमी झाले. रायगड जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार 5033 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. मयत व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान लगेच द्यावे, असेही त्यांनी सांगितले (Damage Caused By Cyclone Nisarga).

संबंधित बातम्या :

सहकार्य करा, रायगडमध्ये 38 तासात परिस्थिती पूर्ववत करु, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचं आवाहन

संकटकाळात महाराष्ट्र एक, मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे आभार : मुख्यमंत्री

‘निसर्ग चक्रीवादळाचा फटका, रायगडला विशेष आर्थिक पॅकेज द्या’, अदिती तटकरे मागणी करणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.