उद्योगधंद्यांना परवानगी, रेशन ते महिलांसाठी मदत क्रमांक, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 15 मुद्दे

ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग-धंद्यांना सशर्त परवानगी, रेशन ते महिलांसाठी मदत क्रमांक, प्रशासनाच्या इत्यादी सुविधा आणि निर्णयांबाबत त्यांनी माहिती दिली

उद्योगधंद्यांना परवानगी, रेशन ते महिलांसाठी मदत क्रमांक, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 15 मुद्दे
Follow us
| Updated on: Apr 19, 2020 | 2:51 PM

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा  हा 3 हजारच्या पार गेला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला (Cm Uddhav Thackeray On Corona) आहे. या पार्श्वभूमीवर आज (19 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना सशर्त परवानगी, रेशन ते महिलांसाठी मदत क्रमांक, प्रशासनाच्या इत्यादी सुविधा आणि निर्णयांबाबत त्यांनी माहिती दिली (Cm Uddhav Thackeray On Corona).

मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह प्रसारणातील महत्त्वाचे 15 मुद्दे

1. 20 एप्रिलपासून आपल्याला हे रुतलेले अर्थचक्र फिरवायचे आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांना सुरुवात करु शकतो

2. कंपन्यांना मजुरांची हमी घेतल्यास उद्योग सुरु करता येतील

3. जिल्ह्यांतर्गत मालवाहतूक सोमवारपासून सुरु

4. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात मालवाहतूक बंदच

5. मदतनिधीसाठी स्वतंत्र सीएसआर खाते, कर सवलत मिळेल

6. महिलांच्या मदतीसाठी 100 हा हेल्पलाइन नंबर

7. मानसिकरीत्या अस्वस्थता वाढली असेल आणि समुपदेशनाची गरज असेल तर मुंबई मनपा आणि बिर्लाच्या 1800 1208 20050 या क्रमांकावर संपर्क साधा (Cm Uddhav Thackeray On Corona)

8. आदिवासी विभाग हेल्पलाइन नंबर – 1800 102 4040

9. स्थलांतरीत मजुरांना सरकार घरापर्यंत पोहोचवेल

10. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे लपवू नका, न घाबरता फिव्हर क्लिनिकमध्ये लगेच जा. लवकर या, लवकर इलाज होईल. गंभीर झालेले रुग्ण देखील बरे झाले आहेत.

11. पीपीई किटचा तुटवडा आहे, खोटं सांगणार नाही, केंद्र आणि राज्य सरकार पीपीई किट देत आहे

12. रेशनवर केंद्राकडून गहू आणि डाळ आली की तीही पुरवू

13. 66, 796 टेस्ट घेतल्या, 95% निगेटिव्ह आहेत

14. मुंबई-पुण्यात घरोघरी वृत्तपत्र वितरण नाही, स्टॉल्स ला परवानगी

15. शेती आणि कृषी , जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत अडथळा येणार नाही

राज्यात कोरोना रुग्णांची स्थिती काय?

राज्यात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 11 बळी गेले, तर एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 328 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रात आता 3 हजार 648 कोरोनाग्रस्त असून राज्यातल्या ‘कोरोना’बळींची संख्या 211 वर गेली आहे. राज्यात काल 34 रुग्ण बरे झाले असून एकूण 365 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 हजार 468 कोरोना टेस्ट झाल्या असून 63 हजार 476 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पुण्यात काल सर्वाधिक ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली. पु्ण्यात काल 78 नवे रुग्ण सापडले. पुण्यातली एकूण रुग्णसंख्या आता 612 वर गेली आहे. पुण्यात काल ‘कोरोना’मुळे एक रुग्ण दगावला.

Cm Uddhav Thackeray On Corona

संबंधित बातम्या :

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना परवानगी, मात्र जिल्हाबंदी कायम : उद्धव ठाकरे

केंद्राच्या सहकार्यानं महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना घरापर्यंत पोहोचवू, उद्धव ठाकरेंचा शब्द

देशातील 23 राज्यांच्या 47 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण नाही : आरोग्य मंत्रालय

गुड न्यूज! औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित बाळंतीणीचे नवजात बाळ ‘कोरोना’ निगेटिव्ह

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.