AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Effect | मुंबईतील ऑर्केस्टा, पब आणि डान्सबार 31 मार्चपर्यंत बंद, मुंबई पोलिसांचे आदेश

येत्या 31 मार्चपर्यंत मुंबईतील सर्व डिस्कोथेक्स, ऑर्केस्टा, पब, डान्सबार बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतचा आदेश काढला (Corona Effect in Mumbai)  आहे. 

Corona Effect | मुंबईतील ऑर्केस्टा, पब आणि डान्सबार 31 मार्चपर्यंत बंद, मुंबई पोलिसांचे आदेश
| Updated on: Mar 17, 2020 | 11:16 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाची ठिकाणं बंद करण्यात येत (Corona Effect in Mumbai)  आहेत. त्यानुसार आजपासून (17 मार्च) येत्या 31 मार्चपर्यंत मुंबईतील सर्व डिस्कोथेक्स, ऑर्केस्टा, पब, डान्सबार बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Corona Effect in Mumbai)  म्हणून मुंबईतील डिस्कोथेक्स, पब आणि तत्सम आस्थापन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे अधिपत्याखालील सर्व ऑर्केस्ट्रा आस्थापना, डान्सबार, पब, डि.जे, लाईव्ह बँड आणि इतर तत्सम आस्थापन उद्या 17 मार्च 2020 पासून 31 मार्च 2020 पर्यंत चालू राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

CORONA : सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, लोकल-बस सुरुच राहणार, नाईलाज झाल्यास बंद करु : मुख्यमंत्री

दरम्यान दुसरीकडे राज्यातील अनेक मंदिरं खबरदारीसाठी बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचं साई मंदिर यासह राज्यातील सर्व मोठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.

नुकतंच पुण्यात आणि मुंबईत आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 41 झाली आहे. त्यात मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात 40 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर, पिंपरीत एकाला लागण

कोरोना संदर्भात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यात कोणतेही शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत. तर अनावश्यक गर्दी, प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.

महाराष्ट्रात कोरोनाचा महिला बळी

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून मुंबईत आलेल्या 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 10
  • पुणे – 7
  • मुंबई – 7
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 41-1(मृत्यू) = 40

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • पिंपरी चिंचवड 1 – 17 मार्च
  • मुंबई 1 – 17 मार्च
  • एकूण – 41 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Corona Effect in Mumbai

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.