AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजभवनातील 100 पैकी 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 60 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

राजभवनातील 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Corona infected Rajbhavan staff Mumbai) आहे.

राजभवनातील 100 पैकी 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 60 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा
| Edited By: | Updated on: Jul 12, 2020 | 9:58 AM
Share

मुंबई : राजभवनातील 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले (Corona infected Rajbhavan staff Mumbai) आहे. या घटनेमुळे राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या 14 जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु (Corona infected Rajbhavan staff Mumbai) आहेत.

राजभवनात एकूण 100 कर्मचारी आहेत. त्यापैकी 40 जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 14 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 60 कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये दोन वरीष्ठ अधिकारी तर काही पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राजभवनात एका इलेक्ट्रिकल शाखा अभियंताची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर 14 जणांना लागण झाल्याचे समोर आले. लागण झालेले सर्व कर्मचारी राजभवनातील स्टाफ क्वार्टरमध्ये राहतात.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दोन दिवसांपूर्वी 100 जणांची चाचणी झाली होती. त्यात 40 जणांचे अहवाल आले आहेत. त्यापैकी 14 जणांना लागण झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

दरम्यान, राज्यातही सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहेत. मात्र, तरीदेखील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 8,139 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 46 हजार 600 वर

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.